ताज्या बातम्याबीड जिल्हामहत्वाचेमहाराष्ट्र

बीड ऊसतोड कामगारांची ऑनलाइन नोंदणी ओळखपत्र दिले जातील – दीपा मुधोळ-मुंडे

बीड : जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ देता यावे. यासाठी त्यांची माहिती शासनाच्या विभागांकडे असणे गरजेचे आहे. यादृष्टीने जिल्ह्यात जिल्हा परिषद, स्वयंसेवी संस्था, समाज कल्याण विभाग, गटविकास अधिकारी यांच्या समन्वयाने विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

20 मे दरम्यान चालणार्‍या या मोहिमेत सदर ऊसतोड कामगारांची ऑनलाइन नोंदणी करण्यात येऊन त्यांना ओळखपत्र दिले जातील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रगती सभागृहात ऊसतोड कामगारांच्या समस्यांबाबत आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्रीमती मुधोळ-मुंडे बोलल्या. बैठकीसाठी अप्पर जिल्हाधिकारी (बीड) उत्तम पाटील, अप्पर जिल्हाधिकारी (अंबाजोगाई) सुनील यादव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त रवींद्र शिंदे यासह विविध विभागांचे अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी यावेळी म्हणाल्या, नोंदणी प्रक्रिया मध्ये ग्रामसेवक व स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी समन्वयाने काम करावे. तालुका निहाय विविध स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधी ऊसतोड कामगारांच्या नोंदणीसाठी प्रत्यक्षात मदत करतील. महा-ई-सेवा केंद्रावर त्यांची ऑनलाइन नोंदणी करून ग्रामसेवकांमार्फत त्या नोंदणीस मान्यता दिली जाईल. शासकीय योजनांच्या लाभासाठी या नोंदणीवर आधारित ओळखपत्र संबंधित ऊसतोड कामगारास दिले जाईल, असे जिल्हाधिकारी श्रीमती मुधोळ -मुंडे यांनी सांगितले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सोळंके यांनी जिल्हा परिषदेच्यावतीने या नोंदणीसाठी तयार करण्यात आलेल्या संगणकीय प्रणालीची माहिती दिली. तसेच ओळखपत्राचा नमुना जिल्हाधिकारी महोदयांना दाखविण्यात आला. सदर बाबींसाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू होताना मागील वर्षी साखर हंगामापूर्वी फक्त पंधरा दिवस मिळाल्याने ऊसतोड कामगारांची पूर्ण नोंदणी होऊ शकली नव्हती आता हे सर्व ऊसतोड कामगार कारखाना स्थळांवरून जिल्ह्यात आपल्या मूळ गावी परत आले आहेत त्यामुळे ही मोहीम यशस्वीपणे राबवण्यात येणार आहे. यावेळी विविध स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी ऊसतोड कामगार, महिला ऊसतोड कामगार, त्यांच्या मुलांचे, शिक्षण, वसतिगृह आदींबाबत अडचणींची माहिती दिली. जिल्हास्तरावरून व राज्यस्तरावरून यासाठी घेण्यात आलेल्या निर्णयाबाबत यावेळी सांगण्यात आले. महिला ऊसतोड कामगारांच्या आरोग्य विषयी योजना पोहचवणे व अडचणी दूर होण्यासाठी त्यांची नोंदणी करून त्यांना स्वतंत्र ओळखपत्र देण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. याप्रसंगी बैठकीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानोबा मोकाटे, गटविकास अधिकारी ए डी सानप, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी सुधीर ढाकणे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर. ए. शेख, शिक्षणाधिकारी एन. एन. शिंदे यासह डॉ एस आर कदम, अमित भिंगारे, सुवर्णा निंबाळकर , ओमप्रकाश गिरी, बाजीराव ढाकणे, आर. जे. शेळके व स्वयंसेवी संस्थांचे दीपक नागरगोजे, मनीषा तोकले, तत्वशील कांबळे, अँनी जोसेफ, नागेश शिंदे, रेवती धिवार, मनीषा घुगे, मनीषा सतीश स्वामी यांनी भाग घेतला. ऊसतोड कामगारांचे अडचणी दूर करण्यासाठी यावेळी विविध बाबींवर चर्चा करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button