सुदवडी येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

0
78
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

मावळ तालुक्यातील सुदवडी येथे सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने छापा मारून कारवाई केली. (Talegaon) त्यात पोलिसांनी 14 हजारांचा मुद्देमाल जप्त करून सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

 

याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार दिवसे, गणेश गुऱ्हाळे, सुनील यादव, बबन कुऱ्हाडे, विशाल वाघमारे, भाऊसाहेब दावणे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदवडी गावात मटका जुगार सुरु असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली. (Talegaon) त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई करत चिठ्ठ्या, कार्बन पेपर, पेन, बुक, रोख रक्कम असा एकूण 14 हजार 50 रुपयांचा ऐवज जप्त केला. आरोपी ओपन टाईम बाजार नावाचा मटका खेळत असल्याचे समोर आले आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here