27.5 C
New York
Saturday, June 15, 2024

Buy now

Video:एक मिठीत तर दुसरी मांडीवर, खचाखच भरलेल्या लोकलमध्ये ..

- Advertisement -

मुंंबई : मुंबई लोकल ही मुंबईकरांची श्वास…एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी तिचा सर्वाधिक वापर केला जातो. या लोकल ट्रेनमधून कामावर जाणाऱ्या लोकांसोबत वृद्धांपासून लहान मुलांपर्यंत सगळेच प्रवास करत असतात.

- Advertisement -

त्यामुळे या लोकलमध्ये एक वेगळीच दुनिया (Mumbai Local Video) असते…रोजची जाणारी मंडळींची एक वेगळीच मजा असते. गाणी, भजन किर्तन करत त्यांचा प्रवास सुरु असतो. (trending video on Social media)

- Advertisement -

नुकताच Norway च्या The Quick Style ग्रुपचा मुंबई लोकल ट्रेनमधील जबरदस्त डान्स व्हिडीओ (Romance video)सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. तो पाहून नेटकरीसोबत मुंबईकर संतापले आहेत. लोकल ट्रेन ही मुंबईकरांचा प्रवासाचं साधन आहे. तिथे कपलचे असे अश्लील चाळे पाहून यूजर्स संतापले आहेत. (Couple Romance Viral Video)

एक मिठीत तर दुसरी मांडीत!

खचाखच भरलेल्या लोकलमध्ये दोन कपल आपल्याच गुंगीत रमलं आहे. त्यांना आजूबाजूला असेलल्या लोकांचंही भान राहिलेलं दिसतं नाही आहे. एक कपल एकमेकांच्या मिठीत रमलं आहे. तर दुसरं जोडप एकमेकांना किस करण्यात रमलं आहे. या दोन कपलच्या रोमान्समुळे लोकलमधील इतर प्रवासी हैराण झाले आहे.

धक्कादायक म्हणजे विंडो सीटजवळील तरुणाच्या मांडीवर ती मुलगी मस्त बसली आहे. तर दुसरा तरुण प्रियशीसोबत अश्लील चाळे करताना दिसत आहे. हे तरुण कॉलेजमधील असल्याचं जाणवतं. आजकालच्या पिढीला मनाची नाही तर जनाची लाजही राहिली नाही असंच दिसत आहे.

 

व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ट्वीटरच्या @ViralBaba या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सांताक्रुझ ते लोअर परळ या स्टेशनदरम्यानचा असल्याचं या व्हिडीओवर लिहिलं आहे. अशा कपलवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

लोकलमधून वृद्धांपासून लहान मुलंही प्रवास करतात. अशावेळी या प्रेमीजोडप्यांचे असे अश्लील चाळे योग्य नाही. त्यामुळे या कृतींवर रोख लावण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी होते आहे.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles