ताज्या बातम्यापरळीबीड जिल्हा

सुरभी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्राचे संचालक विश्वजीत मुंडे यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर

सुरभी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्राचे संचालक विश्वजीत मुंडे यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- शहरातील सुरभी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्राचे संचालक व सामाजिक कार्यकर्ते विश्वजीत मुंडे यांना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल बहुभाषिक भाऊ बाबा वंजारी संघा मार्फत दिला जाणारा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार नुकताच जाहीर झाला असल्याची माहिती बहुभाषिक भाऊ बाबा वंजारी समाजाच्या संस्थापक अध्यक्षा लक्ष्मीताई गरकळ यांनी दिली आहे.
बहुभाषिक भाऊ-बाबा वंजारी संघाच्या वतीने पुणे येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वंजारी संघाच्या मेळाव्यामध्ये विश्वजीत मुंडे यांना सन २०२३ चा समजभूषण पुरस्कार वितरित होणार आहे. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल विश्वजीत मुंडे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. विश्वजीत मुंडे हे वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया सल्लागार म्हणून सर्व सामान्य विद्यार्थ्यांंना महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश येथे एम.बी.बी.एस.,बी.ए.एम.एस., बी. डि.एस., बी.एच.एम.एस.तसेच वैद्यकीय पदव्युत्तर एम.डी.,एम.डी.एस., एम.एस.या अभ्यासक्रमासाठी अनेक शासकीय व खाजगी महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला आहे. यामुळे विश्वजीत मुंडे हे शैक्षणिक व समाज कार्यात नेहमी अग्रेसर असतात. तसेच समाजहितासाठी त्यांचा सतत लढा चालू असून, त्यांनी आजपर्यंत केलेल्या कामाची दखल घेत बहुभाषिक भाऊ बाबा वंजारी समाजाच्या संस्थापक अध्यक्षा लक्ष्मीताई गरकळ यांनी विश्वजीत मुंडे यांना राज्यस्तरीय २०२३ चा समाजभूषण पुरस्कार देण्याचे जाहीर केले आहे. येत्या ३ एप्रिल रोजी विश्वजीत मुंडे यांना सन्मानित केले जाणार आहे. या अगोदर विश्वजित मुंडे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत श्रीनाथ मानव सेवा मंडळ नाथ्रा, ता. परळी वैजनाथ आयोजित सहावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच प्रतिष्ठा फाऊडेशन सांगलीच्या वतीने समाजरत्न पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचे सर्व स्तरातून मान्यवर, मित्रपरिवार व नातेवाईकांकडून व तालुका व जिल्हा स्तरावर सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *