ताज्या बातम्या

सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर यांचा मा.जाॅन्शन यांच्या कडून फ्लाॅरेंन्स नाईटिंगेल अवार्ड ने सन्मान


सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर यांचा मा.जाॅन्शन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडून फ्लाॅरेंन्स नाईटिंगेल अवार्ड ने सन्मानित.

दिनांक २४ मार्च २०२३ ला मा.कन्नमवार सभागृह चंद्रपूर येथे सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका उपजिल्हा रुग्णालय वरोरा यांना जिल्हा स्तरावरील प्रथम पुरस्कार फ्लाॅरेंन्स नाईटिंगेल अवार्ड मुख्य कार्यकारी अधिकारी ,मा.जिल्हा आरोग्य आरोग्य अधिकारी, मा.जिल्हाशल्य चिकित्सक , डॉ कन्नाके निवासि वैद्यकीय अधीकारी मा.अधिसेविका यांच्या कळून प्रथम जिल्हास्तरीय फ्लाॅरेंन्स नाईटिंगेल पूरस्कार प्रदान करण्यात आला.सोबत उपजिल्हा रुग्णालय वरोरा यांना राष्ट्रीय कूटुंब कल्याण कार्यक्रम जिल्ह्यातून ३ क्रमांक डॉ अंकुश राठोड वैद्यकीय अधीक्षक , तर कूटुंब नियोजन शस्त्रक्रिया डॉ लांबट यांना प्रमाणपत्र व मोमैंन्टो ने सन्मानीत करण्यात आले.तसेच रूबिना खान यांना फ्लॉरेन्स नाईटिंगेल अवार्ड व तांबी नियंत्रन कार्यक्रम यासाठी प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका यांना मोमेंन्टो व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले .

 

दिनांक २४ मार्च ला टिबी डे चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका यांनी सेल्फी पाईंन्टला सेल्फी काढून प्रचार आणि प्रसार करण्यात आला


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *