Video:जेएनयूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोची केली विटंबना…

मुंबई : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थी संघाच्या कार्यालयात डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटना आणि एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांत रविवारी जोरदार हाणामारी झाली.

डाव्या संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोवरील हार काढून फोटो फेकून दिले. यासंबंधी एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे.

घटनेची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यांनी दोन्ही गटातील विद्यार्थ्यांना शांत केले. रविवारी जेएनयूच्या विद्यार्थी संघात डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिवजयंती साजरी होत असतांना त्यांच्या फोटोला हार घालण्यात आला होता. मुलांनी हा हार काढून फेकला. तसेच फोटोची देखील विटंबना केली. यामुळे दोन गटात हाणामारी झाली.

 

एबीव्हीपीच्या दाव्यानंतर डाव्यांनीही आपली बाजू मांडली आहे. एबीव्हीपी कार्यकर्त्यांनीच गोंधळ घातला आणि मारहाण केली. एबीव्हीपीने पुन्हा एकदा राडा करण्यास सुरुवात केली आहे. दर्शन सोळंकीच्या वडिलांच्या सांगण्यावरून कँडल मार्च काढण्यात आला होता. दर्शन सोळंकी बॉम्बे आयआयटीमध्ये शिक्षण घेत आहे. जातीयवादी लोकांनी त्यांना मारलं होतं. आमच्या या शांती मार्चला एबीव्हीपीने पूर्ण होऊ दिलं नाही. त्यांनी आमचा मार्च थांबवण्याचा प्रयत्न केला, असं डाव्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, एबीव्हीपीने डाव्यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आम्ही शिवजयंती साजरी करत होतो. परंतु, जेएनयूएसयूच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराजांच्या फोटोवरील हार काढून फेकला. त्यामुळेच वाद सुरू झाला, असं एबीव्हीपीचं म्हणणं आहे. दरम्यान,या घटनेनंतर जेएनयूमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here