ताज्या बातम्या

सत्ता मिळवण्यासाठी वडिलांच्या विचारसरणीच्या विरुद्ध गेले – अमित शाह


निवडणूक आयोगाने शुक्रवारी शिवसेना आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह ‘धनुष्यबाण’ हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील गटाला दिले.

त्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली. आज अमित शाह पुण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. सत्ता मिळवण्यासाठी वडिलांच्या विचारसरणीच्या विरुद्ध गेले, असा टोला अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. काल युतीला खूप मोठा विजय मिळाला, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

धोका देतात त्यांना सोडू नका – अमित शाह
काल युतीला खूप मोठा विजय मिळाला. शिंदेंच्या शिवसेनेला खरी शिवसेना असल्याचं सांगितलं आणि धनुष्यबाण मिळालं. स्वतःपेक्षा मोठा फोटो मोदींचा लावला आणि निवडणूक लढले, आणि मुख्यमंत्री व्हायला विरोधी पक्षाचे तळवे चाटले. जे धोका देतात त्यांना कधी सोडले नाही पाहिजे, अशी टीका अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. इथून बाहेर पडताना मी अपील करतो, लोकसभेत महाराष्ट्रातील सगळी मते भाजप – शिवसेना युतीला पडतील, असेही शाह म्हणाले.

370 हटवला आता काश्मीरमध्ये कुणाची दगड फेकायची पण हिंमत होत नाही. या आधी काश्मीरमध्ये रक्ताच्या नद्या व्हायच्या. पूलवामामध्ये जे झाले त्यावेळी मोदीजी काहीच बोलत नव्हते. बैठका केल्या नाहीत, आम्हाला वाटले युद्ध होईल पण त्यांनी सर्जिकल स्ट्राईक ( Air Strike Surgical strike) केला. मोदीजी १५-१८ तास काम करतात, भारत सर्वप्रथम व्हावा म्हणून ते काम करतात, असे अमित शाह म्हणाले.

अमित शाह यांचं वाक्य म्हणजे… काय म्हणाले शिंदे?

मोदींबद्दल मी काय बोलणार? सरकार कसं स्थापन झालं मी सगळ्यांना सांगितलं नाही. आपली अर्थव्यवस्था 5 नंबरवर आली, जी 20 आलं ही अभिमानाची गोष्ट आहे. बाळासाहेब सांगायचे मुख्यमंत्री व्हा, मी 370 कलम हटवतो, राम मंदिर बंधू … मग आम्ही केलं ते बरोबर ना? काश्मीर आपला अविभाज्य भाग आहे, हे बाळासाहेब म्हणायचे आणि अमित शहा यांनी ते इथे आणले. काही गोष्टी वेळेवर होतात. काल चांगला निर्णय आला. लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. मी खोटं बोलत नाही, शब्द पळतो. अमित शाह यांचं वाक्य म्हणजे पत्थर की लकीर होय, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुणे विमानतळ येथे स्वागत
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुणे विमानतळ येथे आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुकत् शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आदी उपस्थित होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *