Video : जन्मापुढे मृत्यूदेखील हारला; ढिगाऱ्याखाली महिलेने दिला बाळाला जन्म

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये सोमवारी पहाटे ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंपात मोठी जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे.

भीषण भूकंपात आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये सुमारे ५ हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, २० हजारांहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.

भूकंपामुळे जमीनदोस्त झालेल्या ढिगाऱ्याखालून जिवंत नागरिकांचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या भीषण परिस्थितीत एका महिलेने ढिगाऱ्याखाली एका गोंडस बाळाला जम्न दिला आहे.

 

सध्या ढिगाऱ्याखालून या नवजात बाळाला बाहेर काढतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या तोंडून मृत्युच्या तांडवापुढे जीवनाचा विजय झाल्याचे शब्द निघत आहेत.

हा व्हिडिओ सीरियन आणि कुर्दिश विषयावरील पत्रकार होशांग हसन यांनी शेअर केला आहे. यात त्यांनी भूकंपानंतर एका महिलेला ढिगाऱ्यातून वाचवण्याचा प्रयत्न करताना या बाळाचा जन्म झाल्याचे हसन यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here