मुख्याध्यापक विद्यार्थी तरुणीला शाळेतील स्टोर रुममध्ये घेऊन गेला तिच्या बहिणीला स्टोअर रुमला कुलूप लावून बाहेर उभे राहण्यास सांगितले अन..

जालोर जिल्ह्यात गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका शाळेतील मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीसोबत घृणास्पद कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे.

जालोर जिल्ह्यातील शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापकाने एका विद्यार्थिनी व तिच्या बहिणीला सुट्टीच्या दिवशी शाळेत बोलावले. यानंतर विद्यार्थी तरुणीला शाळेतील स्टोर रुममध्ये घेऊन गेला आणि तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केले. तसेच तिच्यासोबत आलेल्या बहिणीला स्टोअर रुमला कुलूप लावून बाहेर उभे राहण्यास सांगितले.

रविवारी शाळेला सुट्टी असते. मात्र यादिवशी देखील शाळेच्या स्टोअर रूमबाहेर एक मुलगी उभी असल्याचे पाहून ग्रामस्थ तेथे पोहोचले आणि कुलूप उघडून विद्यार्थी तरुणीला बाहेर काढले. त्यानंतर दोघांनी सदर घटनेबाबत सांगितले. यावेळी लोकांनी व्हिडिओही बनवले. सदर घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी शाळेसमोर निदर्शने केली. माहिती मिळताच गटशिक्षणाधिकारी भंवरलाल विश्नोई घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी ग्रामस्थांशी बोलून आरोपी मुख्याध्यापक वीराराम चौधरीवर कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here