पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या कारला म्हैसूर येथे अपघात

बंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या कारला म्हैसूर येथे अपघात झाला. ते पत्नी, मुलगा आणि सून यांच्यासह म्हैसूरजवळील बांदीपुरा येथे जात होते.
हा अपघात कडकोलाजवळ झाला, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी हे बंगळुरूहून बांदीपूरला जात असताना म्हैसूर तालुक्यातील कडकोलाजवळ त्यांच्या कारचा अपघात झाला. कारमधील प्रल्हाद मोदी यांचा मुलगा आणि सून जखमी झाले आहेत. या प्रकरणाची माहिती मिळताच म्हैसूरच्या एसपी सीमा लाटकर यांनी घटनास्थळी भेट दिली. यानंतर त्यांनी जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तसेच त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयालाही या अपघाताची माहिती कळवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here