लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार गर्भपातासाठी जिवे मारण्याची धमकी

अमरावती : ज्याच्यावर जीव ओवाळून टाकला, ज्याच्यासोबत सात फेरे घेण्याचे स्वप्न पाहिले, त्याच प्रियकराने प्रेयसीला गर्भपात कर, अन्यथा खल्लास करून टाकेन, अशी गर्भित धमकी दिली.
त्या धमकीने तिच्या पायखालची वाळू सरकली. अखेर तिने त्याच्याविरूद्ध पोलीस ठाण्याची पायरी गाठत तक्रार दाखल केली. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी १९ डिसेंबर रोजी नांदेडच्या आरोपीविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे ते युगूल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर अत्याचार करण्यात आला. त्यातून पीडित तरुणीला गर्भधारणा झाल्यावर गर्भपातासाठी तिला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही संतापजनक घटना राजापेठ ठाण्याच्या हद्दीत १९ डिसेंबर रोजी उघडकीस आली. अविनाश लक्ष्मण मगीरवार (३७, रा. कुंटुर, नांदेड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

अविनाशची जानेवारी २०१९ मध्ये येथील ३२ वर्षीय तरुणीसोबत ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रित झाल्यावर अविनाशने पीडित तरुणीचा विश्वास संपादन करून तिला प्रेमजाळ्यात ओढले. त्यानंतर दोघेही ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहू लागले. या काळात अविनाशने पीडित तरुणीचे वारंवार लैंगिक शोषण केले. त्यातून पीडित तरुणीला गर्भधारणा झाली. याबाबत अविनाशला कळल्यावर त्याने गर्भपात कर, अन्यथा तुला जिवाने मारेल, अशी धमकी पीडिताला दिली. या प्रकरणी पीडित तरुणीने राजापेठ ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी अविनाशविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास आरंभला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here