ताज्या बातम्याबीड जिल्हा

नवगण राजुरी या होमपीचवर माजी मंत्री क्षीरसागर यांच्या गटाचा धुव्वा

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व आ. संदीप क्षीरसागर यांचे होमपीच असलेल्या राजुरी ग्रामपंचायतीत काका- पुतण्याने आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती.येथील निकाल घोषित झाले असून, सरपंच पदासह सर्व १३ सदस्य हे राष्ट्रवादीचे विजयी झाले आहेत. हे सर्व उमेदवार आमदार संदीप क्षीरसागर यांच्या गटाचे आहेत.

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदिप क्षीरसागर आणि माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर या काका पुतण्यातील सत्ता संघर्ष ग्रामपंचायत निवडणुकीत देखील पहावयास मिळाला. राजुरी जिल्हा परिषद सर्कल मधील नवगण राजुरी या होमपीचवर माजी मंत्री क्षीरसागर यांच्या गटाचा धुव्वा उडवत संदिप क्षीरसागर यांनी काकाला धोबीपछाड दिलाय. या सर्कलमधील चार ग्रामपंचायत संदीप क्षीरसागर यांच्या ताब्यात आल्या आहेत.

गेल्या पाच सात वर्षांपासून संदिप क्षीरसागर आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यातील सत्ता संघर्ष सगळ्या महाराष्ट्राने पाहिला आणि अभुवला आहे. पाच वर्षापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार क्षीरसागरांनी नवगण राजुरीच्या ग्रामपंचायती वर आपला झेंडा फडकवला होता. त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा यावेळी त्यांनी केली.

जयदत्त क्षीरसागर यांचे होमग्राउंड असणाऱ्या राजुरीमध्ये आमदार क्षीरसागर यांच्या पॅनलचा मोठा विजय झालाय. त्याचसोबत उमरद जहागीर, लिंबारुई, दगडी शहजाणपूर या ग्रामपंचायत देखील आमदार क्षीरसागर यांच्या ताब्यात आल्या

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *