चिमुकल्या ‘गुगल गर्ल’चा व्हिडीओसोशल मीडियावर व्हायरल लहान वयात मुलीला ज्ञान

काही वर्षांपूर्वी कौटिल्य पंडित नावाचा एक लहान मुलगा जगभरात प्रसिद्ध झाला. त्यामागचे कारण होते त्याची विलक्षण प्रतिभा. वयाच्या अवघ्या 6 व्या वर्षी त्याच्याकडे इतके ज्ञान होते की, ते कोणत्याही प्रश्नाचे तो उत्तर चुटकीसरशी देत ​​असत.
त्यानंतर या मुलाला ‘गुगल बॉय’ म्हटले जाऊ लागले. पण आजकाल एक’गुगल गर्ल’ (Google Girl) ही प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. छत्तीसगडमध्ये राहणाऱ्या या चिमुकल्या ‘गुगल गर्ल’चा व्हिडीओसोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होत आहे, जो पाहून लोकही थक्क झाले.

 

लहान वयात मुलीला ज्ञान

ज्याप्रमाणे गुगल कोणत्याही प्रश्नाचे उत्तर पटकन देतो. त्याप्रमाणेच या व्हायरल व्हिडीओमध्ये एक लहान मुलगी शाळेतील महिला शिक्षिकेने विचारलेल्या प्रश्नांची झटपट उत्तरे देत आहे. या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, शाळेच्या मॅडम आधी प्रश्न विचारू लागतात, त्यानंतर शाळेचे नाव, गाव, गावचे सरपंच इत्यादी प्रश्न विचारतात. मात्र त्या प्रश्नांची उत्तरं ही चिमुकली खूप वेगाने देत आहे. इतकंच नाही, तर या लहान मुलीला तिच्या राज्याच्या म्हणजेच छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांपासून ते देशाच्या पंतप्रधानांपर्यंत, तसेच राष्ट्रगीतापर्यंत सर्व काही माहीत आहे. आता इतक्या लहान वयात मुलीचे हे ज्ञान कोणालाही आश्चर्यचकित करेल.
पाहा छोट्या ‘गुगल गर्ल’चा हा अप्रतिम व्हिडीओ

या ‘गुगल गर्ल’चे नाव पपिया आहे आणि तिचा हा अप्रतिम व्हिडीओ आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केला आहे. अवघ्या एक मिनिट 42 सेकंदांचा हा व्हिडीओ आतापर्यंत 10 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडीओला लाईकही केले असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here