10.4 C
New York
Friday, April 19, 2024

Buy now

मोठी बातमी चीन आणि पाकिस्तानसह अर्ध्या जगावर हल्ला करु शकतो भारत..

- Advertisement -

भारताने आज अग्नि-5 या बॅलिस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी घेतली. यामध्ये भारताला यश मिळालं आहे. त्यामुळे पाच हजार किलोमीटरपर्यंत शत्रुला भेदता येईल.
या मिसाईलचं वैशिष्ट्य म्हणजे रात्रीच्या वेळीही पाच हजार किलोमीटरपर्यंत हल्ला चढवता येणार आहे. मागील अनेक वर्षांपासून अग्नि-5 साठी भारताचे प्रयत्न सुरु होते.
आज भारताने या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. २०१२मध्ये या मिसाईलचं परिक्षण झालं होतं. त्यानंतर २०१३, २०१५, २०१६, २०१८ आणि २०२१ मध्ये परिक्षण झालं होतं. आज यशस्वी चाचणी झाल्याने भारताचं बळ वाढलं आहे.

- Advertisement -

९ डिसेंबर रोजी चिनी सैन्याने अरुणाचल प्रदेशमधल्या तवांग सेक्टरमध्ये घुसखोरी केली होती. भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिल्याने चिनी सैन्य पाठीला पाय लावून पळालं. अशाच कुरबुरी पाकिस्तानकडूनही सुरु असतात. त्या पार्श्वभूमीवर अग्नि-५ हे क्षेपणास्त्र महत्त्वाचं मानलं जात आहे. चीन आणि पाकिस्तानसह अर्ध्या जगावर हल्ला करु शकणाऱ्या या क्षेपणास्त्रामुळे भारताचं वेगळं स्थान निर्माण झालंय.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles