उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्याबाहेर आत्मदहन करेन – भाऊसाहेब शिंदे

मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेत्या दीपाली सय्यद यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आलीय. दीपाली सय्यद यांच्यावर कोट्यवधींच्या फसवणुकीचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीय. विशेष म्हणजे दीपाली सय्यद यांच्या माजी स्वीय सहाय्यकानेच गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दीपाली सय्यद यांनी अनेकांकडून कोट्यवधी रुपये हडप केले, असा गंभीर आरोप त्यांच्या माजी स्वीय सहाय्यकाकडून करण्यात आलाय. त्याच्या या आरोपांवर दीपाली सय्यद नेमकी काय भूमिका मांडतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

भाऊसाहेब शिंदे यांनी दीपाली सय्यद यांच्यावर गंभीर आरोप केलाय. भाऊसाहेब शिंदे हे दीपाली सय्यद यांचे माजी स्वीय सहाय्यक आहेत. “दीपाली यांनी अनेकांची कोट्यवधींची फसवणूक केली. ही फसवणूक त्यांनी ट्रस्टच्या माध्यमातून केली”, असा गंभीर आरोप भाऊसाहेब शिंदे यांनी केलाय.

“ट्रस्टच्या व्यवहारांची चौकशी करावी. अन्यथा आत्मदहन करणार”, असा इशारा दीपाली सय्यद यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी दिलाय. त्यांच्या या इशाऱ्यानंतर राज्य सरकारकडून काही भूमिका घेण्यात येते का? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
“सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या अकाउंटमध्ये 9 हजार 182 रुपये आढळले. याचाच अर्थ बाकीची रक्कम दीपाली सय्यद यांनी कुठून आणली? याची चौकशी व्हायला हवी”, अशी मागणी भाऊसाहेब शिंदे यांनी केली.

“गुन्हे शाखेने चौकशी करावी, अशी विनंती मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करतो. दीपाली सय्यद यांची चौकशी झाली नाही तर मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्याबाहेर आत्मदहन करेन”, असा इशारा भाऊसाहेब शिंदे यांनी दिलाय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here