25.8 C
New York
Saturday, June 15, 2024

Buy now

घरातील महिला सफाई कामगाराशी अफेअर बायकोला ही गोष्ट कळली यानंतर..

- Advertisement -

एका व्यक्तीचे घरातील महिला सफाई कामगाराशी अफेअर सुरू होते. एके दिवशी अचानक त्या व्यक्तीच्या बायकोला ही गोष्ट कळली. यानंतर पत्नीने महिला सफाई कामगाराला बेदम मारहाण केली. सध्या हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे.
हे प्रकरण ऑस्ट्रेलियातील आहे. गोल्ड कोस्ट बुलेटिनच्या रिपोर्टनुसार, 45 वर्षीय जॅकलिन मेरी मॉरिसला ऑगस्टमध्ये तिच्या पतीच्या अफेअरबद्दल माहिती मिळाली. एका आठवड्यानंतर, तिने महिला सफाई कामगाराला खूप सुनावलं. विशेष बाब म्हणजे मॉरिसला तिच्या पतीसोबत दोन मुलेही आहेत.

- Advertisement -

साउथपोर्ट मॅजिस्ट्रेट कोर्टात 5 डिसेंबर रोजी या प्रकरणावरील सुनावणीदरम्यान, महिला सफाई कर्मचाऱ्याने सांगितले की ती गोल्ड कोस्टवर तिच्या कारमध्ये कोणाची तरी वाट पाहत होती. त्याचवेळी मॉरिस त्या ठिकाणी पोहोचली आणि मॉरिसने आपल्याला शिवीगाळ केली. प्रत्युत्तरात सफाई कामगारानेही शिवीगाळ करत आपल्याला तुझ्या नवऱ्याची गरज नसल्याचे तिने म्हटले. मॉरिसने न्यायालयात दावा केला की या महिला सफाई कामगारानेच आपल्याला भडकावले होते. तुझ्या पतीसोबत रोमान्स कसा करायचा ते शिकले पाहिजे, असे तिने आपल्याला सांगितल्याचे मॉरिसने कोर्टाला सांगितले. यानंतर दोघांमध्ये तुंबळ हाणामारीही झाल्याचे समोर आले.

- Advertisement -

एका आठवड्यापूर्वीच मॉरिसला आपल्या पतीच्या अफेअरबद्दल माहिती मिळाली होती, असं तिनं कोर्टाला सांगितले. महिला सफाई कामगार त्यांच्या घरात चार वर्षांपासून कामाला होती. दरम्यान, मॉरिसे त्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचेही कबुल केले आहे.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles