आष्टीताज्या बातम्याबीड जिल्हा

श्री. छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर कृषी महाविद्यालय आष्टी येथे राष्ट्रीय दुग्ध दिन साजरा

श्री. छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर कृषी महाविद्यालय आष्टी येथे राष्ट्रीय दुग्ध दिन साजरा

आष्टी : सन 2014 पासून 26 नोव्हेंबर धवल क्रांतीचे जनक डॉ. वर्गीस कुरियन यांचा जन्मदिन राष्ट्रीय दुग्ध दिन म्हणून साजरा केला जातो. श्री छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर कृषी महाविद्यालय, आष्टी येथे राष्ट्रीय दुग्ध दिन विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.आ. भीमराव धोंडे, दै. झुंजार नेताचे उपसंपादक श्री. उत्तमराव बोडखे, संस्थेचे प्रशासन अधिकारी डॉ. डी. बी. राऊत, अन्नतंत्र महाविद्यालयाचे प्राचार्य एस.एस. मोहोळकर लाभले होते. कार्यक्रमाची सुरुवात धवल क्रांतीचे जनक डॉ. वर्गीस कुरियन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. महाविद्यालयामध्ये शिकत असणाऱ्या तृतीय वर्ष विद्यार्थी तसेच आठव्या सत्रातील दुग्ध व दुग्ध प्रक्रिया या विषयासाठी नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. राष्ट्रीय दूध दिनाच्या औचित्य साधून महाविद्यालयामध्ये दुग्ध पदार्थ निर्मिती, मॉडेल तयार करणे, रांगोळी, पोस्टर सादरीकरण, स्लाईड सादरीकरण इ.स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रा. एल.एस. मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीने वरील स्पर्धेचे परीक्षण करून मूल्यमापन केले. दुग्ध प्रक्रिया पदार्थ निर्मिती स्पर्धेमध्ये कोल्ड कॉफी साठी कु. आर. एस. झांबरे, कु. के. एस. मोरे, स्लाईड सादरीकरण साठी कुमारी जी. एस.येवले, पोस्टर सादरीकरण मध्ये कु. किरण जेठी व कु. व्ही.पी.टी. कढीयाम, रांगोळी स्पर्धांमध्ये कुमारी ए.एस.वायबसे, कुमारी व्ही.ऐ. माळी, कुमारी ए.सी‌. बायस, कुमारी डी.टी. सोमा, मॉडेल निर्मितीमध्ये कु. एस. आर. जल्लादी कु. एस. बी. मिर्झा
या विद्यार्थ्यांनी प्रथम पुरस्कार पटकाविला. या विद्यार्थ्यांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले.
प्राचार्य एस. एस.मोहोळकर यांनी धवल क्रांती कशी घडली यामध्ये सहकारी चळवळीचा सहभाग तसेच डॉ. वर्गीस कुरियन यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. श्री. उत्तमराव बोडखे यांनी आष्टी तालुक्यामध्ये दुग्ध व्यवसायामुळे झालेल्या क्रांतीचा लेखाजोखा विद्यार्थ्यांसमोर मांडला. अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करताना मा.आ. भीमरावजी धोंडे साहेब यांनी डॉ.वर्गीस कुरियन यांच्या कार्याबद्दल गौरव उद्गार काढले. दुधाचे आहारातील महत्त्व विशद करत असताना त्यांनी पंजाब व हरयाणा मधील लोकांच्या शारीरिक बांधाचा उल्लेख करून भारतीय सेनेमध्ये सेवा देण्यामध्ये अग्रेसर असल्याबद्दल अभिनंदन केले. प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना पदवी शिक्षणाचा कालावधीचा उपयोग विद्यार्थ्यांनी स्वतःचे भविष्य घडवण्यासाठी अभ्यास व शैक्षणिक उपक्रमावर भर देवा असे सांगितले. महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना महाविद्यालयाच्या शिस्तीचे पालन करावे असे सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम आरसुळ यांनी धवल क्रांतीच्या वाटचालीबाबत मार्गदर्शन केले. आज भारत जगामध्ये दुग्ध उत्पादनात प्रथम क्रमांकावर असून भारताचे दूध उत्पादन 198 मॅट्रिक टन इतकी आहे. हे सर्व शक्य होण्याचे कारण म्हणजे धवल क्रांतीची यश होय. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख कु.एस.एल.बनकर राष्ट्रीय सेवा योजना प्रभारी डॉ.एम.ऐ. आजबे, कार्यक्रम नियोजन समिती श्री. आर.एस.हंगे, डॉ. एस. एस. भोसले यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्षातील विद्यार्थी कुमारी व्ही.एस. ढोबळे व कु. एस. बी. शिंदे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन कु. ए.एस. सोनवणे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चतुर्थ वर्षातील विद्यार्थी कु. एस. एस. थोरवे व कु. यु.व्ही.घोडके यांनी प्रयत्न केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *