हर घर तिरंग्या प्रमाणेच हर घर संविधान नारा आवश्यक – अशोक आठवले

हर घर तिरंग्या प्रमाणेच हर घर संविधान
नारा आवश्यक – अशोक आठवले

बीड (प्रतिनिधी): भारतीय संविधान सन्मान दिन सन 2008 पासून राज्य शासकीय व निमशासकीय कार्यालयात आयोजित करण्याचे शासन निर्देश शासन स्तरावरुन निर्गमीत झाल्यापासून सर्वत्र भारतीय संविधान सन्मान दिन आयोजित केला जातो. यास अनुसरून मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तहसिल कार्यालय परिसरात शासन मान्यता प्राप्त दिव्यांग कर्मचारी संघटनेच्या कार्यालयात भारतीय संविधान सन्मान दिनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाच्या आयोजन प्रसंगी बीड येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक ढोले यांच्यासह नगरसेवक संजय उडाण, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे, वरिष्ठ सहाय्यक कैलास तांगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी कार्यक्रमात प्रास्ताविक करतांना शासन मान्यता प्राप्त दिव्यांग कर्मचारी संघटना प्रदेश उपाध्यक्ष अशोक आठवले यांनी संविधानाचे महत्व विषद करतांना सांगितले की, ज्या प्रमाणे आपण राष्ट्रीय ध्वज म्हणून तिरंग्याचा सन्मान करतो व हर घर तिरंगा हा नार अंगीकारतो त्याच प्रमाणे हर घर संविधान हा नाराही प्रत्येक भारतीय नागरीकांनी आंगीकारून संविधानाचे रक्षण केले पाहिजे. तसेच या प्रसंगी पुढे बोलतांना नगसेवक संजय उडाण, अशोक येडे, कैलास तांगडे यांनीही संविधानाचे महत्व उपस्थितांना विस्तृतरित्या सांगितले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रामभाऊ शेरकर यांनी केले. तर याच कार्यक्रमास अनुसरून 26/11 हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या पोलीस कर्मचार्‍या प्रती उपस्थितांनी स्तब्ध राहून आदरांजली अर्पण करून कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. यावेळी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष कैलास तांबडे, रामधन जमाले, माऊली शिंदे, सय्यद सादेक, समाजसेवक शरद झोडगे, सत्यनारायण सावंत, विलास सावंत, बिरजू चव्हाण, अशोक शिंदे आदींची उपस्थिती होती.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here