तब्बल ८ वर्षाच्या पाठपुराव्यानंतर अखेर शहीद सुभेदार शिवाजी शिंदे यांचे स्मारक निवेदने,आंदोलनानंतर पूर्णत्वास :- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

तब्बल ८ वर्षाच्या पाठपुराव्यानंतर अखेर शहीद सुभेदार शिवाजी शिंदे यांचे स्मारक निवेदने,आंदोलनानंतर पूर्णत्वास :- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
___
लिंबागणेश येथील शहीद जवान सुभेदार शिवाजी रंगनाथ शिंदे हे सुरजगड (राजस्थान)येथे सैन्यात कार्यरत असताना दि.०२ सप्टेंबर २०१४ रोजी शहीद झाले होते. लिंबागणेश येथे शासकीय ईतमामात त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुढा-यांची पोकळ आश्वासने नेहमीप्रमाणेच हवेत विरली
_____
शहीद सुभेदार शिवाजी रंगनाथ शिंदे यांच्या वीर पत्नी श्रीमती साधना शिंदे,मुलगा कार्तिक शिंदे,मुलगी शितल शिंदे यांचे सांत्वन करण्यासाठी तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंढे,आ.जयदत्त क्षीरसागर,आ.विनायक मेटे यांनी स्मारक बांधण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन दिले होते मात्र ते हवेतच जिरले.

शहीद स्मारकासाठी हुतात्मादिनी वीरपत्नीला सहकुटुंब ग्रामस्थांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाची वेळ
___
प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे वर्ष उलटुनही कोणतीही प्रगती न झाल्यामुळे अखेर शहीद स्मारकासाठी दि.१७ सप्टेंबर २०१५ दिनी मराठवाडा मुक्तिसंग्रामच्या ६७ व्या वर्ष दिनानिमित्त डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली वीरपत्नी श्रीमती साधना शिंदे मुलगा कार्तिक शिंदे,मुलगी शितल शिंदे व ग्रामस्थ विक्की वाणी,मंगेश जाधव,अभिजित गायकवाड,सय्यद अझीम,अशोक वाणी,कल्याण आबदार,सागर जाधव,दिपक ढवळे,मयुर वाणी,अमोल जाधव,प्रशांत वाणी,गणेश कानिटकर,समाधान मुळे,चंद्रकांत शिंदे आदिंनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते.

शहीद स्मारकासाठी प्रयत्नशील ग्रामस्थांचे आभार : कार्तिक शिंदे( (शहीद शिवाजी शिंदे यांचा मुलगा )
____
ग्रामस्थांची शहीद सुभेदार शिवाजी शिंदे यांचे जन्मगावी स्मारक उभारण्यात यावे अशी ईच्छा होती पुढा-यांनी केवळ आश्वासनेच दिली. मात्र सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे व ग्रामस्थांनी पाठपुरावा करत अखेरीस स्मारक पूर्णत्वास आणले याबद्दल समाधान असुन ग्रामस्थांचे आम्ही आभारी आहोत.

सरपंच निकिता गलधर व भाजपा नेते स्वप्निल गलधर यांच्या प्रयत्नातून स्मारक अखेर पूर्णत्वास
___
प्रशासकीय व लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष झाल्यानंतर निवेदन आंदोलनानंतर विद्यमान सरपंच निकिता गलधर व भाजपा तालुकाध्यक्ष स्वप्निल गलधर यांनी प्रशासनाशी पाठपुरावा करत महतप्रयत्नातुन अखेर ८ वर्षानंतर शहीद सुभेदार शिवाजी शिंदे यांचे स्मारक ग्रामपंचायत समोर पूर्णत्वास येत असून लवकरच त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here