मेंढपाळासह त्याच्या 3 वर्षीय चिमुकल्याचा निर्घृण खून

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील तालुक्यात तुपूरवाडीत मेंढपाळासह त्याच्या 3 वर्षीय चिमुकल्याचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली. मृत बाप लेक कर्नाटकमधील जोडकुरळी (ता.चिक्कोडी, जि. बेळगाव) या ठिकाणचे आहेत. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचा संशय आहे.

केंचाप्पा मारुती हारके (वय 37) व मुलगा शंकर (वय 3) अशी मृतांची नावे आहेत. दोन नोव्हेंबरपासून हारके तुपूरवाडीत हद्दीतील रिकाम्या शेतवडीत बकऱ्‍यांचा कळप घेऊन आले होते. दरम्यान, काल सकाळी केंचाप्पा यांची पत्नी श्रीदेवी लहान मुलीला घेऊन कपडे धुण्यासाठी गेली असताना केंचाप्पा, मुलगा शंकर व नातेवाईकांच्या कुटुंबातील काही सदस्य त्या ठिकाणी होते. मात्र, परत आल्यानंतर तिला कोणीच दिसत नसल्याने पती व मुलाचा शोध घेतला. मात्र, त्याच ठिकाणी असेल म्हणून परत आपल्या कामाला लागली.

शेतवडीत कुठे तरी गेले असतील म्हणून ती तळावरच आपल्या कामात मग्न झाली. दरम्यान, हल्लेखोराने आपल्या भावाला केंचाप्पाशी भांडण झाल्याचे सांगितले. त्याने दुसऱ्या मेंढपाळाला सांगून माहिती घेतली असता चिमुकला शंकर जखमी अवस्थेत आढळला. त्याला तत्काळ नेसरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्‍यांनी सांगितले. केंचाप्पाही गवतामध्येच रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेला होता.

त्याच्यावरही धारदार शस्त्राने वार झाल्याने चेहऱ्‍यासह संपूर्ण शरीर, कपडे व आसपासचे गवत रक्ताने माखले होते. केंचाप्पा जागीच ठार झाला होता. हल्लेखोराच्या भावाने मृत केंचाप्पाच्या भावांना माहिती दिल्यानंतर ते आणि इतर नातेवाईक सायंकाळच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले.
माहिती मिळताच तुपूरवाडी, कडाल, मुंगूरवाडी ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके, उपनिरीक्षक विक्रम वडणे यांच्यासह आजरा, नेसरीचे पोलिस अधिकारी फौजफाटा घेऊन घटनास्थळी आले. शेळकेयांनी केंचाप्पाची पत्नी, भाऊ यांच्याकडे प्राथमिक चौकशी केली. त्यावेळी केंचाप्पाची पत्नी श्रीदेवीने गुरुवारी रात्री बिराप्पा संकरट्टी व केंचाप्पा यांच्यात वाद झाल्याची माहिती शेळके यांना दिली. याच वादातून हा प्रकार घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

 

✍️✍️हे ही वाचा

नवगण न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

लोकशाही न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here