प्रेम प्रकरणातून पळून जाऊन लग्न केल्यानंतर पत्नीची मुलासह आत्महत्या

सांगली जिल्ह्यातील जत तालुल्यात पळून जाऊन प्रेमविवाह केलेल्या एका महिलेनं आत्महत्या केली.
आपल्या दोन कोवळ्या मुलांसह विवाहितेनं विहिरीत उडी टाकली आणि जीव दिला. या दोन्ही मुलांसह विवाहितेचाही दुर्दैवी अंत झाला. 3 वर्षांआधी पळून जाऊन लग्न केलेल्या या विवाहितेच्या सोन्यासारख्या संसाराला अचानक कलाटणी का मिळाली, असा प्रश्न या घटनेनं उपस्थित झालाय. अख्खा जत तालुका या घटनेनं हादरुन गेलाय. जत तालुक्यातील सिंदूर या गावात ही धक्कादायक घटना घडली.

जत तालुक्यातील सिंदूर गावात 23 वर्षीय विवाहित तरुणीने आत्महत्या केली. आपला एक मुलगा आणि मुलीसह तिने विहिरीत उडी टाकली. स्वतःच्या शेतातील विहिरीतच विवाहितेनं उडी मारत आत्महत्या केली. रविवारी ही धक्कादायक घटना घडली.

दिव्या धनेश माडग्याळ, असं आत्महत्या केलेल्या 23 वर्षीय विवाहितेचं नाव आहे. तिला एक 9 महिन्याचा मुलगा होता. तर एक 2 वर्षांची मुलगी होती. तीन वर्षांपूर्वी पळून जाऊन दिव्याने धनेश माडग्याळसोबत प्रेमविवाह केला होता. पत्नीनं केलेल्या आत्महत्येनं धनेश माडग्याळ यांना मोठा धक्काच बसलाय.
नऊ महिन्यांच्या मुलाचा मृतदेह रात्री विहिरीत तरंगताना आढळून आला होता. त्यानंतर रात्री हा मृतदेह जत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. तर सोमवारी मायलेकींचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. हसत्या खेळत्या घरातील तिघांच्या एकाएकी मृत्यूने संपूर्ण गावात खळबळ माजलीय.

सिंदूर येथील लक्ष्मी धनेश माडग्याळ हिचा तीन वर्षापूर्वी एका तरुणाशी विवाह झाला होता. मात्र तिला तो पसंत नव्हता. त्यामुळे दिव्याने गावातीलच धानेश सिद्दनिंग माडग्याळ या युवकाबरोबर तिने प्रेम विवाह केला. धनेश माडग्याळ याच्याबरोबर तिने पळून जाऊन लग्न केलं होतं.
प्रेम प्रकरणातून पळून जाऊन लग्न केल्यानंतर दिव्याच्या आईवडिलांशी दाम्पत्याचे वाद सुरु होते. हे प्रकरण मिटवण्यासाठी मुलीच्या आई-वडिलांना धनेश माडग्याळ याने काही रक्कम दिली होती. या वादातून त्यांचे सारखे खटके उडत होते. यातूनच तिने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं असल्याची चर्चा गावात सुरू आहे.

9 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृतदेह आढळून आल्यानंतर लगेचच तो ग्रामस्थांनी बाहेर काढला होता. रविवारी रात्री चिमुकल्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर सांगोल्याच्या पथकाला बोलवून मुलगी आणि विवाहितेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि नवगण न्युजला फॉलो करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here