वृत्तपत्र विक्रेत्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करून वृत्तपत्र विक्रेता दिन सामाजिक कार्यकर्त्याकडुन साजरा:- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

वृत्तपत्र विक्रेत्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करून वृत्तपत्र विक्रेता दिन सामाजिक कार्यकर्त्याकडुन साजरा:- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
____
भारतरत्न डाॅ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त गेल्या ३ वर्षापासून १५ ऑक्टोबर “वृत्तपत्र विक्रेता दिन “साजरा करण्यात येतो त्यानिमित्त वाचकांपर्यंत वृत्तपत्र पोहचवण्याचे महत्वाचे काम करणा-या वृत्तपत्र विक्रेत्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राज्यभर साज-या होणा-या वृत्तपत्र विक्रेता दिनाच्या निमित्ताने आज दि.१५ ऑक्टोबर शनिवार रोजी शासकीय विश्रामगृहात सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, शेख युनुस,रामनाथ खोड,के.के.वडमारे, राहुल कवठेकर,सय्यद आबेद यांनी वृत्तपत्र विक्रेते ,वितरक यांचा पुष्पगुच्छ,शाल ,श्रीफळ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करत कृतज्ञता समारोह साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दैनिक कार्यारंभ संपादक शिवाजीभाऊ रांजवण,प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक दिव्य मराठी बीड ब्युरो चीफ दिनेश लिंबेकर, न्युज १८ लोकमतचे जिल्हाप्रतिनिधी सुरेश जाधव, महाराष्ट्र टाईम्स चे रोहीत दिक्षित,मॅक्स महाराष्ट्रचे हरिदास तावरे , मुक्तपत्रकार एस.एम.युसुफभाई,पत्रकार बालाजी जगतकर,पत्रकार शेख तालेब, प्रेस फोटोग्राफर कृष्णा शिंदे आदि.उपस्थित होते. कार्यकर्माचे सूत्रसंचालन डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केले यावेळी वृत्तपत्र वितरण तसेच वितरक क्षेत्रातील सुदाम चव्हाण,सुमुर्ति वाघीरे,परमेश्वर खरात,विद्याभुषण बेदरकर,गणेश भालेकर,अमित सासवडे,श्रीराम जाधव,राजेश बाभुळगावकर,शैलेश गोलांडे, मुक्तपत्रकार एस.एम.युसुफभाई, पत्रकार बालाजी जगतकर ,पत्रकार शेख तालेब ,प्रेस फोटोग्राफर कृष्णा शिंदे यांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

सविस्तर माहीतीस्तव:-
___
कुटुंबाला हातभार लावण्यासाठी वयाच्या ८ व्या वर्षापासून वृत्तपत्र वितरणाचे काम करत कामातुन झालेल्या कमाईने जागृत केलेली आत्मसन्मानाची भावना भारतरत्न डाॅ.एपीजे अब्दुल कलाम यांनी बोलून दाखवली होती. गेल्या ३ वर्षापासून डाॅ.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस “वृत्तपत्र विक्रेता दिन “म्हणून साजरा करण्यात येतो. छोट्या खेडेगावातील छोटा वृत्तपत्र विक्रेता ते जागतिक किर्तीचे शास्त्रज्ञ असा विस्मयकारक प्रवास करणा-या डाॅ.एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस या निमित्ताने साजरा करणे गौरवास्पद बाब आहे.

वृत्तपत्र विक्रेत्याचे मुलभुत प्रश्नांचा सामाजिक कार्यकर्ते आणि माध्यमांनी शासन दरबारी पाठपुरावा करावा:- शिवाजी रांजवण संपादक दैनिक कार्यारंभ
____
वर्तमान विक्रेत्यांचे प्रश्न सामाजिक कार्यकर्ते आणि माध्यमांनी समन्वयाने मांडत शासन दरबारी पाठपुरावा करावा असे आवाहन दैनिक कार्यारंभ चे संपादक शिवाजी सोनाजीराव रांजवण यांनी केले,पत्रकारांना ज्या काही सोई सुविधा उपलब्ध आहेत त्याच धर्तीवर वृत्तपत्र विक्रेत्यांनाही या सुविधा शासनाने उपलब्ध करून द्यायला हव्यात कारण विक्रेते हे वर्तमानपत्राचाच एक भाग असुन त्यांच्या मागण्यांकडे आता सकारात्मकतेने बघण्याची गरज आहे.

वृत्तपत्र विक्रेत्यांनी चिकाटी व कठोर परीश्रमाची तयारी ठेवावी,आत्मिक समाधान मिळतं:-परमेश्वर खरात (वृत्तपत्र वितरक/विक्रेते)
____
तरूण मुलांमध्ये मेहनतीची , चिकाटी व परिश्रम करण्याची तैय्यारी हवी,अनेकांना वाटते हा व्यवसाय अल्प लाभ देणारा आहे परंतु ज्या वृत्तपत्र विक्रेते,वितरक यांनी चिकाटीने या क्षेत्रात पाय रोवले त्यांची मुले-मुली आजमितीला डाॅक्टर,इंजिनिअर उच्च शिक्षण घेत आहेत. आमच्या कार्याची दखल घेतल्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्यांचे आभार.

ऊन,पाऊस,थंडी याची तमा न बाळगता वाचकांपर्यंत वृत्तपत्र पोहचवणारे विक्रेते महत्वाचा सेतु:-डाॅ.गणेश ढवळे
____
पावसाळा असो किंवा हिवाळा,भल्या पहाटे उठुन वृत्तपत्राचे गठ्ठे ताब्यात घेऊन सायकलवर किंवा चालत घरोघरी जाऊन वर्तमानपत्र वाचकांपर्यंत नित्यनेमाने पोहोच करणारे वृत्तपत्र विक्रेते वृत्तपत्र आणि वाचक यामधील सेतु असुन त्यांचा सामाजिक कार्यकर्ते म्हणून सन्मान करणं ही आमच्यासाठी अभिमानास्पद मनाला नितांत सुखदायक गोष्ट आहे.

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here