ताज्या बातम्याबीड जिल्हा

बेलगाववस्तीकरांचा वस्तीशाळा समायोजनास तिव्र विरोध;दुर्गम भागातील शाळा;साठवण तलावाच्या भिंतीवरून प्रवास:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर


बेलगाववस्तीकरांचा वस्तीशाळा समायोजनास तिव्र विरोध;दुर्गम भागातील शाळा;साठवण तलावाच्या भिंतीवरून प्रवास:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
___
बीड तालुक्यातील मौजे. बेलगाव ग्रामपंचायत अंतर्गत बेलगाव वस्ति अंदाजे ३०० लोकसंख्या असलेल्या वस्तिवरील मुलांसाठी २००३ मध्ये वस्तीशाळा सुरू झाली. सध्या शाळेची पटसंख्या १० असून बहुतांश ऊसतोड मजूर व शेतक-यांची मुलं आहेत. वस्तीशाळा बंद पडली तर मुलांचं शिक्षणच बंद होण्याची भिति बोलुन दाखवली.

तलावाच्या भिंतीवरून,सांडव्यातुन लेकराना शाळेत कसं पाठवायचं:-जयश्री कोळपे
___
माझी दोन मुलं शाळेत असुन वस्तीशाळा बंद झाली तर २ किलोमीटर गावात साठवण तलावाच्या भिंतीवरून सांडव्यातुन पावसाळ्यात लेकरं पाठवायची कशी??आम्ही मोलमजुरी करून पोटं भरायची का??मुलांना शाळेत सोडायचं मायबाप सरकारनंच सांगावं.

ऊसतोडीला पोरं देशावर गेल्यावर म्हतारीनं शाळंत जाणारी लेकरं कशी सांभाळायची? :-साखरबाई कोळपे
____
मला दोन पोरं असुन ऊसतोडीला हुपरी कारखान्यावर जातात,शाळात जाणारी ५लेकरं माझ्यापाशी ठेऊन जातेत. वस्तिशाळा बंद झाल्यावर मी लेकरं गावातल्या शाळात कशी पाठवायची आणि सांभाळायची कशी???

ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव घेतला:-सरपंच अश्विन शेळके
____
बेलगाव वस्तिवरील शाळा दुर्गम भागातील असुन साठवण तलावाच्या भिंतीवरून ,सांडव्यातुन तसेच २ किलोमीटर अंतर चालणे शालेय मुलांना शक्य नसल्यामुळेच शाळेचे समायोजन करण्यात येऊ नये असा ग्रामपंचायत तसेच शाळा व्यवस्थापन समितिचा ठराव शिक्षण विभागाला पाठवला आहे.

सरकारचा तुघलकी निर्णय आहे, शिक्षण बचाव नागरी समिती रस्त्यावर उतरून विरोध करणार:-डाॅ.गणेश ढवळे
____
भौगोलिक परिस्थिती , वास्तविकता आदिचा कुठलाही विचार न करता २० पेक्षा कमी पटसंख्या असणा-या शाळांचे समायोजन करण्याचा निर्णय तुघलकी असुन ग्रामिण भागातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकण्याचा व मोफत आणि सक्तिच्या शिक्षण कायद्याची पायमल्ली करणारा असून शिक्षण बचाव नागरी समिती बीड याचा रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करेल असे निमंत्रक राजकुमार कदम,संघटक डाॅ.गणेश ढवळे,काॅ.नामदेव चव्हाण ,सुनिल क्षीरसागर ,पी.एस.घाडगे,डी.जी.तांदळे,उत्तमराव सानप,डाॅ.सतिश साळुंके, मनोज जाधव,रामहरी मोरे,नितिन रांजवण,संजय इंगोले,सुहास जायभाये,बबन वडमारे,गणेश आजबे,ज्योतीराम हुरकुडे,भाऊराव प्रभाळे,मोहन जाधव,आदिंनी सरकारला ईशारा दिला आहे.

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *