सिटी हॉलमध्ये सामूहिक गोळीबार झाला त्यात किमान 10 जणांचा मृत्यू

अमेरिकेच्या मेक्सिकन (Mexico Firing) सिटीमधून मोठी बातमी समोर येत आहे.
येथील सिटी हॉलमध्ये सामूहिक गोळीबार झाला असून त्यात किमान 10 जणांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार मृतांमध्ये महापौरांचाही (Mayor) समावेश आहे.

एका अज्ञात व्यक्तीने हॉलमध्ये प्रवेश केला, आणि…
मिळालेल्या माहितीनुसार, मेक्सिकन सिटी हॉलमध्ये एक कार्यक्रम सुरू होता त्या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने हॉलमध्ये प्रवेश केला, त्यावेळी तो काही सेकंद थांबला आणि अचानक अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाला. यात महापौरांव्यतिरिक्त त्यांचे वडील, माजी महापौर आणि महापालिका अधिकारी तसेच पोलिसांचाही मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

भिंतीवर बंदुकीच्या गोळ्यांच्या खुणा

या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या घटनेची काही छायाचित्रे समोर आली आहेत. ज्यात एका भिंतीवर बंदुकीच्या गोळ्यांच्या खुणा दिसत आहेत. किमान 30-35 गोळ्या दिसत आहेत. तर, पोलिसांनी पकडलेल्या आरोपीचे आणखी एक चित्र समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणावर अद्याप अधिकृत वक्तव्य आलेले नाही. मात्र, एका संघटनेने या घटनेची जबाबदारी स्वीकारली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here