क्लास संपल्यावर घरी जाताना ट्रकच्या धडकेत मुलगी ठार

चाळीसगाव : क्लास संपल्यानंतर स्कूटीवरून घरी जात असताना भरधाव ट्रकने धडक दिल्याने अल्पवयीन मुलगी जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना धुळे रोड महामार्गावर घडली आहे.
कु. सायली भागवत हडपे (वय-१५) रा. शिवदर्शन कॉलणी, चाळीसगाव हि मुलगी शुक्रवार रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास क्लास संपल्यावर आपल्या स्कुटीने (क्र. जीजे ०६ बी क्यू ०४५४) घरी जात जात होती. तेव्हा अचानक मागून भरधाव वेगाने धुळेकडे जाणाऱ्या ट्रकने (क्र. एम.एच.४६ एफ ३२३२) जोरदार धडक दिली. या भिषण अपघातात कु. सायली भागवत हडपे या मुलीचे उजवा हात व उजवा पाय ट्रकच्या पुढील चाकाखाली दाबले गेले. यामुळे तिला गंभीर दुखापत झाली. त्यावर शहरातील एका खासगी दवाखान्यात उपचाराकामी दाखल केले असता पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्याबाबत सांगण्यात आले. त्यानुसार तिला नाशिकला घेऊन जात असताना रस्त्यात तिचे प्राणज्योत मालवली. तत्पूर्वी या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करुन पंचनामा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here