अहमदनगरक्राईमताज्या बातम्या

भावजयीला गंमती गंमतीत बंदूक दाखवत असताना, बंदकीतून गोळी सुटून भावजयीचा जागीच मृत्यू

अहमदनगर जिल्ह्यातील पोहेगाव येथे भावजयीला गंमती गंमतीत बंदूक दाखवत असताना, बंदकीतून गोळी सुटून भावजयीचा जागीच मृत्यू झाला
घटना घडल्यानंतर आरोपी पसार झाले असून, एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. दोन आरोपी अजून फरार आहेत. आरोपी विशाल भालेराव मयत सुनीता भालेराव यांना दाखवायला बंदूक आणली, थट्टा मस्करीत ट्रीगर दाबला गेल्याने सदर घटना घडली.

अहमदनगर जिल्ह्यातील पोहेगाव येथे एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. भावजयीला गंमती गंमतीत बंदूक दाखवत असताना दिराकडून भावजयीला गोळी  लागली आहे. भावजय सुनीता भालेराव गोळीबारात मयत झाल्या आहेत. घटनेनंतर आरोपी विशाल भालेराव घटनास्थळाहून फरार झाला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्यास अटक केली आहे. तर त्याच्यासोबतचे दोन मित्र अद्यापि फरार असून, त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील मयत सुनिता भालेराव यांचा मुलगा कल्पेश भालेराव याने याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे. आई सुनीता भालेराव गुरुवार दिनांक 7 जुलै रोजी सकाळी केसांना कोरफड लावत होती. याच दरम्यान फिर्यादीचा चुलता आणि त्याचे दोन मित्र घरात आले. आईला म्हटले की, वहिनी बघ मी बंदूक आणली. याच वेळी आरोपी सिद्धार्थ याला चुलते विशाल यांनी विचारले की, बंदूक कशी चालते? सिद्धार्थनेदेखील बंदूक हातात घेत खटका मागे ओढून पुन्हा विशालच्या हातात दिली.

बंदूक दाखवत असताना काही गडबड होऊ नये म्हणून घरातील व्यक्तींनी विरोध केला. मात्र, चुलते विशाल यांनी फक्त वहिनीला दाखवण्यास आणल्याचे सांगितले, अशी माहिती मृतक महिलेच्या मुलाने पोलिसांना दिली असल्याची माहिती शिर्डी पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव यांनी दिली आहे.

थट्टा-मस्करीत बंदूक हाताळणे सुरू होते. याच दरम्यान चुलते विशाल यांच्याकडून ट्रिगर दाबला गेला आणि आईच्या डोक्यात गोळी लागली. यावेळी आई सुनीता भालेराव रक्ताच्या थोराळ्यात पडल्या. तर आरोपी विशाल भालेराव, सिद्धार्थ कदम आणि अमोल भालेराव हे तिघेही बंदूक आणि गोळ्या घेऊन फरार झाले, असे कल्पेश भालेरावने पोलिसांना सांगितलं. दीर विशाल भालेराव याच्याकडून डोक्यात गोळी लागलेल्या सुनीता भालेराव यांना उपचारासाठी दाखल असता, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button