अंडी देणारा खडक

चीनच्या दक्षिण पश्चिम प्रांतात गिझोउ प्रांतात एक अनोखा खडक आहे. हा खडक दर तीस वर्षांनी अंडी (फक्त आकाराच्या स्वरूपात) देतो. अंड्यासारखा आकारातील हा प्रकार खाली कोसळत असतो.चीनमधील हा रहस्यमय खडक अत्यंत चर्चेत आहे. अंड्यासारखा खडकातील आकार आपोआप त्याच्यापासून वेगळा होतो. खडकाची उंची सुमारे 19 फूट असून तो 65 फूट लांब आहे. चीनच्या या रहस्यमय खडकाला ‘चन दन’ या नावाने ओळखले जाते

चीनच्या दक्षिण पश्चिम प्रांतात गिझोउ प्रांतात एक अनोखा खडक आहे. हा खडक दर तीस वर्षांनी अंडी (फक्त आकाराच्या स्वरूपात) देतो. अंड्यासारखा आकारातील हा प्रकार खाली कोसळत असतो. चीनमधील हा रहस्यमय खडक अत्यंत चर्चेत आहे. अंड्यासारखा खडकातील आकार आपोआप त्याच्यापासून वेगळा होतो. खडकाची उंची सुमारे 19 फूट असून तो 65 फूट लांब आहे. चीनच्या या रहस्यमय खडकाला ‘चन दन’ या नावाने ओळखले जाते(Chan Dan, the mysterious egg-laying rock in China, is in the news).

हा पूर्ण खडक काळ्या रंगाचा आहे. यामुळे खडकाची अंडीही काळ्या रंगाची आहेत. खडकाचा भाग आपोआप बाहेरच्या दिशेने येऊ लागतो, त्यानंतर तो खाली पडतो. वैज्ञानिकदेखील या पूर्ण प्रक्रियेला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु यामागील रहस्याचा उलगडा त्यांना करता आलेला नाही.

चन दन या नावाचा अर्थ अंडी देणारा खडक असा आहे. खडकातून निघणारी अंडी लोक आनंदाचे प्रतीक मानतात. याचमुळे ही अंडी जमिनीवर पडताच लोक ती घेऊन जातात. ही अंडी काळ्या रंगाची आणि थंड तापमानाची असतात. अंडय़ाचे हे रहस्य सोडविण्याचा प्रयत्न वैज्ञानिक अनेक वर्षांपासून करत आहेत. भूवैज्ञानिकांनुसार हा खडक सुमारे 500 दशलक्ष वर्षे जुना आहे. इतक्या वर्षांपासून हा खडक सर्वप्रकारचे तापमान झेलत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here