बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी रसवंती चलाओ आंदोलन

अतिरिक्त ऊसउत्पादक शेतक-यांप्रती शासन, प्रशासन, कारखानदारांच्या संवेदनाहीन ऊदासीन धोरणाच्या निषेधार्थ बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी रसवंती चलाओ आंदोलन डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली  करण्यात आले


बीड : अतिरिक्त ऊसप्रश्नी शेतक-यांप्रती शासन, प्रशासन,लोकप्रतिनिधी व साखर कारखानदारांच्या संवेदनाहीन उदासीन धोरणाच्या निषेधार्थ तसेच अतिरिक्त ऊसाला एकरी लाख रूपये अनुदान द्यावे , गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथील ऊसउत्पादक शेतकरी नामदेव आसाराम जाधव यांच्या आत्महत्येस जबाबदार शासन, प्रशासन, साखर कारखानदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी आदि मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि.१२ मे २०२२ गुरूवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्व. नामदेव आसाराम जाधव यांना श्रद्धांजली अर्पण करून शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ लक्ष्यवेधी “रसवंती चलाओ आंदोलन” करण्यात येऊन सामाजिक कार्यकर्त्यांनी ऊसाचा रस गाळुन नागरीकांना विनामूल्य वाटप करण्यात आले,यावेळी आंदोलनात भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर , रिपब्लिकन पार्टीचे आनिल तुरूकमारे, उपाध्यक्ष मराठवाडा ऑल इंडीया पॅथर सेना नितिन सोनावणे, सामाजिक कार्यकर्ते शेख मुबीन, सय्यद आबेद,संदिप जाधव तसेच आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे ,सचिव रामधन जमाले, माऊली शिंदे, दत्ता सुरवसे, दत्ता गुंजाळ, मिलिंद पाळणे,किसानपुत्र श्रीकांत गदळे, बलभीम उबाळे, राम घुले, सतिश बडे आदि सहभागी होते, निवेदन नायब तहसीलदार जि.का. आर्सुळ यांना देण्यात आले.

सविस्तर

स्व. नामदेव जाधव यांच्या आत्महत्येस जबाबदार प्रशासन, कारखानदार यांच्यावर कारवाई करा :- डाॅ.गणेश ढवळे
_____
मौजे. हिंगणगाव ता.गेवराई जि.बीड येथिल ऊसउत्पादक शेतकरी नामदेव आसाराम जाधव( वय ३५ वर्षे)यांनी दि.११ मे २०२२ वार बुधवार रोजी दुपारी आपल्या ऊसाचे गाळप होणार नाही या चिंतेने ऊसाला आग लाऊन ऊसामधील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली यास जबाबदार शासन, प्रशासन, साखर कारखानदार यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्य़ातील ऊसाचं टीपरू सुद्धा शिल्लक राहणार नाही असा शब्द दिला होता तर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री धनंजय बीड मुंडे यांनी हार्वेस्टरने ऊस गाळप करण्याचे दिलेले आश्वासन हवेतच जिरले आहे. त्यामुळेच लोकप्रतिनिधींकडून ऊसउत्पादक शेतक-यांची घोर निराशा झाली आहे,त्यामुळेच वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे
जेणेकरून भविष्यात ईतर ऊसउत्पादक शेतक-यांवर आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये. तशी घटना घडल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.

शिवरायांच्या नावाचा वापर करणा-या आघाडी सरकारकडून मराठवाड्यावर अन्याय :- माजी सैनिक अशोक येडे (जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी)
____
शिवरायांचे नाव घेऊन चालणारे आघाडी सरकार मराठवाड्यावर जाणीवपुर्वक अन्याय करत आहे, शेतक-याच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये अन्यथा मुलाहीजा बाळगला जाणार नाही म्हणणारे छत्रपती शिवाजीमहाराज एकीकडे आणि ऊस पेटवून त्यात झाडाला गळफास घेणारे शेतकरी एकीकडे महाविकास आघाडी सरकारचे मंत्री केवळ बोलघेवडे असुन पोकळ आश्वसने देत असुन त्यांना ऊसउत्पादक शेतक-यांची पर्वा नाही.

अतिरिक्त ऊसाला एकरी लाख रूपये अनुदान द्या, लढा महाराष्ट्रभर तिव्र केला जाईल:- नितिन सोनावणे उपाध्यक्ष मराठवाडा ऑल इंडीया पॅथर सेना
____
सरकारने अतिरिक्त ऊसउत्पादक शेतक-यांना एकरी लाख रूपये अनुदान तातडीने द्यावे.माजलगावचे आ.प्रकाशदादा सोळुंके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून निवेदनाद्वारे हेक्टरी लाख रूपये अनुदान ही मागणी अव्यवहार्य असुन एक एकर ऊस जोपासण्यास शेतक-यांना ४० हजार रूपये खर्च असून कमीतकमी एकरी लाख रूपये उत्पन्न निघते त्यामुळेच हेक्टरी नव्हेत तर एकरी लाख रूपये अनुदान देण्यात यावे तसेच
३१ मार्च नंतर गाळप केलेल्या ऊसाचे शेतातच दिर्घकाळ उभा असल्याने वजन घटुन त्याचे सरपण झाले असून प्रतिटन ५०० रूपये नुकसान भरपाई देण्यात यावी शासनाने लक्ष न दिल्यास लढा आणखी तीव्र केला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here