लवकरच वीजप्रश्न मार्गी लागणार – शरद पवार

जळगाव : देशभरात विजेचा प्रश्न गंभीर असून केवळ भाजपचे शासन असलेल्या राज्यात विजेचा प्रश्न कमी आहे. कारण कोळसा उत्पादन आणि वितरण हे केवळ मोजक्याच ठिकाणी केले जाते, भाजप शासन असलेल्या राज्यांना कोळसा पुरवठा नियमित होत असल्याने तेथे वीजप्रश्न कमी आहे, परंतु महाराष्ट्रा पुरते सांगायचे तर राज्यात ऐन उन्हाळ्यातच नव्हेतर गेल्या काही महिन्यापासून वीजनिर्मितीसाठी लागणाऱ्या कोळशाचा पुरवठा केला जात नाही, त्यामुळे ऐन उन्हाळ्यात मागणीच्या प्रमाणात देखील वाढ झाल्याने वीजटंचाई निर्माण झाली आहे, यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री यांना तोडगा काढण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली आहे. सोमवार मंगळवार नंतर याबाबत योग्य तो निर्णय होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here