ताज्या बातम्याबीड जिल्हा

केशर आंब्याची बाग आगीत भस्मसात, महसुल प्रशासनाकडुन स्थळपंचनामा -डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर


केशर आंब्याची बाग आगीत भस्मसात, महसुल प्रशासनाकडुन स्थळपंचनामा -डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
___
लिंबागणेश येथिल प्रगतिशील शेतकरी प्रभाकर सखाराम तागड यांच्या पोखरी तहत लिंबागणेश गट नं १३२ मधील ३० गुंठे क्षेत्रातील ४ वर्षे वयाची केशर आंब्याची एकुण ७० पैकी ५० झाडे आज दि. २५ मार्च शुक्रवार रोजी दुपारी साडेबारा वाजता आगीत भस्मसात झाली, त्याचवेळी आंब्याला पाणी देण्यासाठी वापरले जाणारे ठिंबक सिंचन अंदाजे खर्च २०,००० रूपये तसेच स्प्रिंकलर पाईप अंदाजे १०,००० रूपये नुकसान झाले. याचवेळी शेता शेजारील शिवराम वायभट, रविंद्र वायभट, अशोक वायभट, कचरू रणखांब यांना कळताच त्यांनी मोठ्या मेहनतीने आग आटोक्यात आणली.

महसुल प्रशासनाकडुन पंचनामा;मंडळ आधिकारी, तलाठी उपस्थित
___
दुपारी आग विझवल्यानंतर तलाठी सज्जा लिंबागणेश गणपत पोतदार यांना फोनवरून कल्पना दिली असता तात्काळ मंडळ आधिकारी वंजारे व तलाठी गणपत पोतदार यांनी स्थळपंचनामा करून तहसिल कार्यालयात अहवाल सादर केला.

महसुल प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी :-डाॅ.गणेश ढवळे
___
ग्रामिण भागातील शेतक-यांनी ज्वारी, बाजरी आदि पारंपरिक पिकं सोडून पालेभाज्या सोबतच फळबाग लागवड लावण्यास सुरूवात केली असून कोणतेही शासकीय अनुदान न घेता ४ वर्ष वयाची जोपासलेली केशर आंब्याची झाडे व ठिबक सिंचन यांचे झालेले नुकसान पाहता महसुल प्रशासनाने नुकसान भरपाई देण्यात यावी.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *