8.3 C
New York
Thursday, March 28, 2024

Buy now

मुंबईत आमदारांसाठी 300 घरं बांधणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

- Advertisement -

मुंबई : आज विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केलीय. आमदारांना मुंबईत कायमस्वरुपी घर मिळावं अशी मागणी बुधवारी विधानसभेत शिवसेना आमदारांकडून करण्यात आली होती.त्याच धर्तीवर आज मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. कारण आमदारांसाठी आता मुंबईत 300 घरं बांधणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलीय. महाविकास आघाडीचं सरकार फक्त बोलणारं नाही तर करून दाखवणारं सरकार आहे, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी यावेळी विरोधकांवर जोरदार फटकेबाजी केली आहे. मुंबईत अनेकजण येतात कष्ट करतात, मात्र सध्याकाळी पाठ टेकायला घर नसतं, हाच विचार करून मुंबईकरांसाठी काही मोठे निर्णय मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहेत.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles