ताज्या बातम्याधार्मिक

ठाकरे सरकारकडून होळीवरील सर्व निर्बंध मागे


कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर राज्य सरकारने होळी (Holi) आणि रंगपचमी (Rang Panchami) या सणांवर निर्बंध लावले होते. बोर्डाच्या परीक्षा (Board Exam) चालू आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास नको म्हणून नियमावली लागू करण्यात आली होती.मात्र ठाकरे सरकारच्या (Thackeray Government) या नियमावर सर्वसामान्यांनी विरोधकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे सरकारने निर्बंध मागे घेतले आहेत. राज्य सरकारने घेललेल्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना होळी धुळवड आणि रंगपंचमी सण मोठ्या उत्साहात साजरा करता येणार आहे.

नियमांमधील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे वेळेचं बंधन काढून टाकण्यात आलं आहे. शक्यतो रंग लावणं टाळावं आणि शिमगा साजरा करताना पालखीची मिरवणूक ही घरोघरी न घेऊन जाता मंदिरात नेण्यात यावी अशी सूचना देण्यात आली आहे.

गृहखात्याचे आधी कोणते नियम होते ?
धुलीवंदनाच्या दिवशी जबरदस्तीने रंग लावू नये, पाण्याचे फुगे फेकू नयेत. तसेच होळीदरम्यान डीजे (DJ) लावण्यावर कायदेशीर बंदी, होळी ही रात्री 10 च्या आत पेटवणे हं बंधनकारक होतं. होळी साजरी करताना मद्यपान तसेच बिभत्स वर्तन केल्यास कारवाई आणि कोणत्याही जातीधर्माच्या भावना दुखावतील अशा घोषणा देऊ नये असे नियम गृहखात्याने (Maharashtra Home Department) केले होते.
दरम्यान, याआधीच्या नियमावलीवरून भाजपचे नेते राम कदम यांनी सरकारवर टीका केली होती.
महाराष्ट्र (Maharashtra) सरकारचा एवढा टोकाचा हिंदू सणांना (Hindu Festivals) विरोध का ?, आता पुन्हा त्यांनी होळी आणि रंगपंचमी साजरी करण्यावर निर्बंध घातलेत.
आहो तुम्ही घाबरट असाल … हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे.
आम्हाला कळते स्वत:ची कशी काळजी घ्यायची. तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात, असं राम कदम (Ram Kadam) यांनी म्हटलं होतं.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *