मुख्यमंत्री ग्रामसडक योजना ग्रामीण भागातील रस्ते राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते, रस्ते विकास संस्थेचे आधिकारी पोसण्यासाठीच भ्रष्टाचाराचे कुरण
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्याची जाडी बोटाचं कांडभर सुद्धा नाही, डांबर नव्हे काळं पाणी ; ३ वर्षापुर्वीच काम पुर्णत्वाचे फलक:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
_____
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ग्रामविकास विभागामार्फत ग्रामीण भागातील रस्ते राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते आणि म.ग्रा. रस्ते विकास संस्थेचे आधिकारी पोसण्यासाठीच करण्यात येत असल्याचा पुन्हा प्रत्यय येत असून भ्रष्टाचाराचे कुरण झालेले रस्ते ग्रामस्थांना दळणवळणाची साधनापेक्षा भ्रष्ट नेते-आधिका-यांचे खिसे भरण्याचे काम होत असून अत्यंत निकृष्ट रस्त्याप्रकरणात गुणनियंत्रक विभागामार्फत तपासणी व संबधित ठेकेदार-आधिका-यांवर कारवाई करण्यात येऊन कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, प्रधान सचिव, विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना केली आहे.
सविस्तर माहीतीस्तव
__
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रा.मा. ५६ ते मुळुकवाडी-मसेवाडी रस्ता सुधारणा काम रूंदी ० ते २/८०० पॅकेज क्रमांक RDBEE-23,कामाची अंदाजित किंमत १ कोटी २६ लाख रूपये असून मे. रूद्रा कन्स्ट्रक्शन औरंगाबाद या कंत्राटदारामार्फत ४ दिवसापुर्वी करण्यात आले असून काम सुरू झाल्याचा दिनांक १ सप्टेंबर २०१८ तर काम पुर्णत्वाचा दिनांक १ सप्टेंबर २०१९ असा फलकावर असून कार्यकारी यंत्रणा कार्यकारी अभियंता (प्रमंग्रासयो)म.ग्रा. रस्ते विकास संस्था बीड यांच्यामार्फत करण्यात आले असून ग्रामविकास मंत्रालय मुंबई अंतर्गत रस्ताकाम आहे.
अत्यंत निकृष्ट रस्ताकाम,संबधित ठेकेदार-आधिका-यांवर कारवाई करण्यात यावी:- कृष्णा पितळे सरपंच मुळुकवाडी
____
मुळुकवाडी ते मसेवाडी रस्ता सुधारणा काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात येत असून अंदाजपत्रकाप्रमाणे काम करण्यात आले नसुन संबधित प्रकरणात वरिष्ठ यंत्रणेने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.
पावसाळ्यात रस्ता वाहुन जाणार, डांबर नव्हे तर काळं पाणी:-दादा ढास, अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती मुळुकवाडी
_____
रस्ताकाम अंदाजपत्रकाप्रमाणे करण्यात आले नसुन डांबराऐवजी केवळ काळं पाणी वापरण्यात आले असून येत्या पावसाळ्यातच संपुर्ण रस्ता धुऊन जाणार यात शंकाच नाही.
काम सुरू करून पुर्णत्वाची तारीख ३ वर्षापुर्वीची काम २ दिवसात पुर्ण ;
मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, प्रधान सचिव, विभागीय आयुक्तांना तक्रार:-डाॅ.गणेश ढवळे
_____
अत्यंत निकृष्ट रस्त्याप्रकरण संबधित ठेकेदार-आधिका-यांवर कारवाई करण्यात येऊन कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात यावे तसेच दि. ७ आणि ८ मार्च २०२२ दोनच दिवसात काम पुर्ण करण्यात आले असून फलकावर मात्र काम सुरू होण्याचा दिनांक १ सप्टेंबर २०१८ तर काम पुर्णत्वाचा दिनांक १ सप्टेंबर २०१९ असून प्रत्यक्षात काम ३ वर्षानंतर सुरू करून २ दिवसातच पुर्ण केले. संबधित प्रकरणात मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, प्रधान सचिव, विभागीय आयुक्त यांना तक्रार करण्यात आली असून संबधित ठेकेदार-आधिका-यांवर कारवाई करण्यात येऊन कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात यावे.