प्रा.अंजलीताई पाटील यांना क्रांतीज्योत पुरस्कार

बीड :  नवजीवन व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून व्यसनमुक्ती ,आरोग्य, सामाजिक व महीला समुदेशन केंद्र अंबाजोगाई च्या माध्यमातून महीला न्याय व हक्क या विषयावर तत्परतेने मराठवाड्यात व राज्यात विशेष ऊल्लेखनिय कार्य केल्या बद्दल महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्ती परीषदेच्या, व राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्ष तथा नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रांच्या प्रकल्प संचालिका प्रा.अंजलीताई पाटील यांना नुकताच नाशिकच्या अहिरे स्पर्धा परीक्षा अकँडमी व स्टार न्युज नाशिक यांच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत व जेष्ट सिने अभिनेत्री हमाल दे धमाल फेम प्रेमा किरण यांच्या हस्ते क्रांतिज्योत पुरस्कार नाशिकच्या रोटरी हाँल मध्ये प्रदान करण्यात आला तांईच्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here