चार राज्यातील भाजपचे यश हा पंतप्रधान मोदीजींचाच करिश्मा -मा.आ.भीमराव धोंडे

नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

आष्टी : उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यामध्ये चुरशीने लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकांचे काल निकाल जाहीर झाले. यात पंजाब वगळता चारही राज्यांमध्ये भाजपाची एकहाती सत्ता आली. योगी आदित्यनाथ दुसन्यांदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होतील. उत्तर प्रदेश विधानसभेत ४०३ जागा असून पक्षांना बहुमतासाठी २०२ सदस्यांचे संख्याबळ लागेल. बहुतांश निकालानंतर उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला पूर्ण बहुमत मिळालेले आहे

मात्र उत्तर प्रदेशात काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. जनतेने काँग्रेसला नाकारलं आहे.२०१७ च्या निकालांनी २०१९ चं भवितव्य ठरवलं असं विश्लेषकांचे मत होतं. आता २०२२ चे निकाल २०२४ चं भवितव्य ठरवणार असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. पाच राज्यापैकी चार राज्यांमध्ये भाजपचं कमळ फुललंय. आज आपल्या भाजप कार्यकर्त्यांचा उत्साहाचा आणि उत्सवाचा दिवस आहे. आष्टी, पाटोदा व शिरुर विधानसभा मतदार संघात आज उत्साहाचा आणि उत्सवाचा दिवस आहे. भारताच्या लोकशाहीचा हा विजय आहे. जनतेचा विश्वास संपादन करण्यात भाजपला यश मिळाले आहे. पंतप्रधान मोदी यांचा आंतराष्ट्रीय पातळीवर प्रभाव आहे. पंतप्रधान मोदी हे जगात सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. चार राज्यातील भाजपचे यश हा पंतप्रधान मोदीजींचाच करिश्मा आहे असे प्रतिपादन मा.आ.भीमराव धोंडे यांनी केले.
आष्टी येथील मा.आ.भीमराव धोंडे यांच्या भाजप कार्यालयासमोर तोफा, फटाके ढोल, ताशा, बॕन्ड वाजवुन भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी जल्लोस साजरा करीत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी मा.आ.भीमराव धोंडे यांनी ढोल वाजवुन आनंद व्यक्त केला. यावेळी शंकर देशमुख यांनी प्रस्ताविक केले. यावेळी माजी सभापती ॲड.साहेबराव म्हस्के, डॉ.अजय दादा धोंडे, आदिनाथ सानप, अशोक साळवे यांची भाषणे झाली. यावेळी माजी सभापती ॲड.साहेबराव म्हस्के, डॉ.अजय दादा धोंडे, आदिनाथ सानप, अशोक साळवे, डाॕ.शैलजा गर्जे, राजेंद्र धोंडे, अमोलराजे तरटे, ॲड.रत्नदीप निकाळजे, नगरसेवक ज्ञानदेव राऊत, शंकर देशमुख, रावसाहेब लोखंडे, तालुका उपाध्यक्ष रघुनाथ शिंदे, नगरसेवक पप्पु गर्जे, सरपंच महादेव कोंडे, अस्ताक शेख, सरपंच संजय नालकोल, बबनराव काकडे, बाबु कदम, बाबासाहेब गर्जे, सदाशिव दिंडे, सुनिल सानप, दादा जगताप, संभाजी झांबरे, अज्जुभाई शेख, पांडुरंग धोंडे, बबन सांगळे, नरवडे मुकादम आदि मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here