9.1 C
New York
Thursday, March 28, 2024

Buy now

बिकट परिस्थितीवर मात करत मयुर पवळ यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड

- Advertisement -

आष्टी : स्पर्धा परिक्षा ही कोणत्याही परिस्थितीवर मात करायला शिकवते.परिक्षा बळ देखील देते.
फक्त एखादी गोष्ट पुर्ण करण्यासाठी अभ्यासूव्रत्ती आणि चिकाटी असली पाहिजे.
मग जिद्दीसमोर परिस्थिती देखील हार पत्करते हेच मयुर पवळ यांच्या यशावरून दिसते.

आष्टी तालुक्यातील कडा येथील न्हावी समाजातील सामान्य कुंटुंबातील सलून चालक रमेश पवळ यांचा मुलगा मयुर हा नुकतीच झालेल्या एम पी एस सी परीक्षेत उत्तीर्ण झाला असून त्यांची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे.मयूरचे बालपण आणि शैक्षणिक जीवन कडा येथे गेले तर त्यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती.प्रचंड आर्थिक चणचण पाहिली. वडिलांचा सलून व्यवसाय करून कुंटुंब व दोन मुलांच्या शिक्षणाचा खर्च करताना अनेक आर्थिक अडचणी आल्या पण मुलांच्या शिक्षणास अडथळा येऊ दिला नाही.आपल्या मुलांनी देखील अधिकारी व्हावे अशी आई वडिलाची प्रबळ इच्छा होती.जागतिक महिला दिना दिवशी त्यांच्या एम पी एस सीच्या परिक्षेचा निकाल लागला आणि आईला महिला दिनीच अनमोल पी एस आय झाल्याची भेट दिली.
मयुरला यशाचा एक एक डोंगर सर करताना अनेक अडथळे आले ,पण इच्छा आणि जिद्द या जोरावर यशासाठी लढत राहिला.
मयूरला मार्गदर्शन लाभले ते त्याचा मोठा भाऊ मंगेशचे भावामुळेच यशाच्या शिखरावर जाता आले.मंगेश ही यू पी एस सि ची तयारी करत आहे.मयूरच्या यशाबद्दल कडा शहरात बुधवारी मयूर येताच फटाके फोडून त्याचे अनेकांनी स्वागत करून औक्षण केले. त्यांच्या यशाबद्दल सरपंच अनिल ढोबळे, आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम,तलाठी नंदा शिंदे, डॉ उमेश गांधी, सजय ढोबळे,प्रविण बहिर, राजूशेठ पोखरणा,अनिल शिंदे,ग्रा.प सदस्य संजय पवळ, विठ्ठल पवळ, सोमनाथ पवळ,किरण गायकवाड,अविनाश पवळ, अशोक पवळ,दिपक पवळ, सूरज पवळ,ऋषिकेश पवळ,रविंद्र गायकवाड,गणेश पवळ,पाडूरंग भुजबळ,रवि पवळ आदींनी अभिनंदन केले आहे.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles