मधुमेहाच्या रुग्णासाठी आहार कसा असावा ?

spot_img

साखर, गूळ, मिठाई, चॉकलेट असे गोड पदार्थ पूर्णपणे बंद करावे.
फास्ट फूड, कोल्ड्रिंक्‍स, शिळे अन्नपदार्थ सेवन करणे पूर्णपणे टाळावे.
तळलेले पदार्थ, स्निग्ध पदार्थ बंद करावे.दूध, साय, लोणी, नारळ, अंडी, पामतेल, शुद्ध तूपही यांमुळे हृदय रोगालाही आमंत्रण मिळते.
मोनो अनसॅचुरेटेड नावाची चरबी शेंगदाणा, मोहरी, तीळ यांपासून बनलेल्या तेलात आणि फिश ऑइल यामध्ये जास्त असते. यांचे सेवन फायदेशीर असते. जवस, अक्रोड, बदाम, मासे, बीन्सही फायदेशीर
ट्रान्सफॅटी ऍसिड्‌स घातक असतात. वनस्पती तूप, वारंवार तळलेले पदार्थ, चीज, पिझ्झा, बर्गर, वडापाव, पावभाजी यात हे प्रमाण जास्त असते.

मैदा, ब्रेड, भात, बटाटा, रताळे बंद करावे.
आंबा, केळी, चिक्‍कू, द्राक्षं ही फळे बंद करावीत.
पालेभाज्या, कोबी, गवार, दोडके, कारले, शेवगा या भाज्या खाव्यात.
मोड आलेली कडधान्ये, सर्व प्रकारच्या डाळी, काकडी, गाजर, मुळा, टोमॅटो हे जास्त खावे.
टरबूज, पपई, बोर, पेरू, जांभळे, सफरचंद, करवंदे इत्यादी फळे घ्यावीत. रोज एक फळ खाणे रोग्यासाठी चांगले असते.
तंतुमय पदार्थांचे सेवन करावे जसे रागी, बाजारी, मका, गहू इत्यादी.
द्रव पदार्थ उदा. लिंबूपाणी, फळांचा रस, भाज्यांचा रस, सूप इत्यादी घ्यावेत.
मधुमेहाच्या रुग्णाने उपवास टाळावेत. रक्तातील साखर कमी होऊन बेशुद्धवस्था येण्याची शक्‍यता असते. प्रवास करतानाही जेवणाच्या वेळा पाळाव्यात.

मधुमेहासाठी आदर्श असा आहार नाही. पण काही मूलभूत गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतं. द्राक्षं, रताळी, ओमेगा – ३ फॅटी अॅसिड असलेले मासे, गडद हिरव्या पालेभाज्या यांचा आस्वाद घ्यावा. पदार्थांवरील लेबल काळजीपूर्वक वाचा आणि सॅच्युरेटेड फॅट्स आणि ट्रान्सफॅट किती आहेत त्यावर नजर ठेवा. त्याऐवजी ऑलिव्ह ऑइलसारखी मोनो किंवा पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स निवडा. नोंदणीकृत आहारतज्ज्ञ तुम्हाला तुमच्या प्रकृतीनुसार आहार सुचवू शकतो.

मधुमेह हा आजकाल अगदी सामान्य झालेला आजार आहे. भारताला तर मधुमेहींची राजधानी म्हणून संबोधले जाते. बदललेली जीनवशैली, अपूरी झोप, जेवणाच्या अयोग्य वेळा, ताणतणाव, व्यायामाचा अभाव यांसारखे अनेक बदल मधुमेहास कारणीभूत ठरतात. मधुमेह जडल्यानंतर कायम खाण्यापिण्याची पथ्यं पाळावी लागतात. पण अशी काही फळे आहेत जी मधुमेही अगदी बिनधास्त खाऊ शकतात.

जांभूळ
जांभूळ मधुमेहींसाठी अगदी उपयुक्त फळ मानले जाते. त्यामुळे ब्लड शुगर नियंत्रित येण्यास मदत होते. इतकंच नाही तर जांभळाची बी सुकवून त्याची पावडर बनवा आणि त्याचे सेवन करा.

संत्र
संत्र्यात व्हिटॉमिन सी आणि फायबर्स असतात. त्यामुळे ब्लड ग्लुकोजचे प्रमाण कमी होते आणि इन्सुलिन वाढते.

अननस
अननसात कॅलरी आणि ग्लायसेमिक इंडेक्स दोन्ही कमी प्रमाणात असतात. त्यामुळे ग्लुकोज अचानक वाढत नाही.

सफरचंद
मधुमेही सफरचंदचे सेवन करु शकतात. यात फायबर्स भरपूर प्रमाणात असल्याने फायदा होता.

पपई
पपईत व्हिटॉमिन सी आणि अॅँटीऑक्सीडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे मधुमेहींसाठी ते अतिशय उत्तम ठरते.

नासपती
नासपतीमध्ये फायबर्स आणि अॅँटीऑक्सीडेंट्स असल्याने ते मधुमेही खाऊ शकतात.

पेरु
पेरुत ग्लायसेमिक इंडेक्स कमी असून व्हिटॉमिन सी, फायबर्स आणि अॅँटीऑक्सीडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे मधुमेही पेरु खाऊ शकतात.

 

Related Articles

Latest Articles

महाराष्ट्र न्युज 24 - सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

spot_img
spot_img

लोकशाही न्युज 24 - सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

spot_img

स्कूटीवरून ऑफिसला जाणाऱ्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले उपचारादरम्यान तीचा मृत्यू , तो गंभीर…

केरळ : स्कूटीवरून ऑफिसला जाणाऱ्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिल्याची घटना केरळमध्ये सोमवारी (19 फेब्रुवारी) घडली आहे. यात पीडित 32 वर्षीय महिलेचा...

VIDEO : भारतात अवघ्या १० रुपयांना मिळणारा कढीपत्ता कॅनडात मिळतोय ‘इतक्या’ रुपयांना

भारतीय मसाल्याच्या पदार्थांपैकी एक महत्त्वाचा पदार्थ आहे कढीपत्ता . खाद्यपदार्थाला स्वाद येण्यासाठी आपण फोडणीत त्याचा आवर्जून वापर करतो. त्यामुळे भारतातील अनेक खाद्यपदार्थांमध्ये तुम्हाला कढीपत्त्याचा...

पोलीस ठाण्यातच निरीक्षकाने डोक्यात झाडून घेतली गोळी

नाशिक : येथील अंबड पोलिस ठाण्यातील गुन्हेशोध शाखेचे पोलीस निरीक्षकांनी मंगळवारी (ता. २०) सकाळी साडेनऊ-पावणे दहाच्या सुमारास केबिनमध्ये स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉलव्हरमधून डोक्यात गोळी झाडून...

मनोज जरांगेंनी उपचार थांबवले, पुन्हा तीव्र उपोषण सुरु; विधेयक मंजूर झाल्यानंतर म्हणाले..

अंतरवाली सराटीः मराठा आरक्षणासाठी मंगळवारी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं होतं. अधिवेशनामध्ये मराठा समाजासाठी सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग असा प्रवर्ग निर्माण करत स्वतंत्र आरक्षण...

मेंदीचे खुनी हात,लग्नानंतर पाचव्याच दिवशी नवरीने घेतला पतीचा जीव..

लखनऊ : हत्येची एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील मऊ येथे खुनाची ही खळबळजनक घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी एका...