जपानमध्ये 1000 वर्षापासुन कैद आसलेल भयंकर भुत मुक्त , काय आहे सत्य

जपानमध्ये असा एक धक्कादायक प्रकार घडला आहे की ज्यामुळे सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. एका प्राचीन जपानी दगडाने 1000 वर्षांपूर्वी एका राक्षसाला पकडल्याचा दावा केला होता.

जग आणि मानव अनेक प्रकारच्या संकटांचा सामना करत आहेत. कुठे पावसाच्या समस्येने जग हैराण आहे तर, कुठे दुष्काळ. गेल्या दोन वर्षांत जगाने कोरोनासारख्या महामारीचाही जोरदार मुकाबला केला आहे. सध्या जगात एकीकडे युद्ध सुरु आहे. तर, दुसरीकडे जपानमधील एका विचित्र संकटाने काही लोकांची रात्रीची झोप उडवली आहे. जपानमधील काही स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की, सुमारे 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेले एक ‘भयानक भूत’ आता मुक्त झाले आहे. जपानमध्ये हा दगड ‘किलिंग स्टोन’ (Killing Stone) किंवा सेशो-सेकी (Sessho-seki) म्हणून ओळखला जात होता, त्याचे आता तुकडे झाले आहेत.

दुष्ट आत्मा झाल मुक्त?
स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, या दगडाच कैद झालेला एका ‘दुष्ट आत्म्या’ची सुटका करण्यात आली आहे, जी यावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी चिंतेची बाब आहे. जपानी पौराणिक कथेनुसार, हा ज्वालामुखीचा खडक ज्याचे अधिकृत नाव सेश-सेकी आहे, ते एका दृष्ट आत्म्याचे घर होते, असा दावा करण्यात येत आहे.

खडकाजवळ जायला घाबरतात लोक
स्थानिकांचे असे मानणे आहे की, या भूताने एका सुंदर स्त्रीचे रूप धारण केले होते, जे 1107 ते 1123 पर्यंत जपानच्या सम्राट टोबाच्या हत्येच्या कटात सामील होते. हा खडक टोकियोजवळ तोचिगीच्या उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशात आहे. हे ठिकाण पूर्वी पर्यटनाचे केंद्र असले तरी आता या घटनेनंतर पर्यटक येथे जाण्यास घाबरत आहेत. काही लोक म्हणतात की, हा आत्मा पुन्हा एकदा विनाश करण्यासाठी मुक्त झाला आहे.

हा खडक दोन वर्षांपूर्वी तुटण्यास सुरुवात झाली
तज्ज्ञांच्या मते, हा खडक दोन वर्षांपूर्वी तुटण्यास सुरुवात झाली होती. पावसाचे पाणी खडकातील दरडीत गेल्याने त्याचे दोन तुकडे झाल्याचे समजते. तो लवकरच खडकाच्या भागांचा बंदोबस्त करण्याचे काम करणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

टीप – ही बातमी फक्त एक इंटरनेटवरील व्हायरल ट्रेंडिग टॉपिक म्हणून लोकरंजनाचा विषय आहे. या निमित्ताने भूतखेताचं समर्थन किंवा त्याविषयी भिती, अंधश्रद्धा पसरवण्याचा नवगण न्युज चा कोणताही मानस नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here