रशियावर तब्बल 5530 निर्बंध , कोणत्या देशावर किती निर्बंध ?


रशिया : रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धाची तीव्रता आणखी वाढली आहे. रशियातर्फे युक्रेनवर हवाईल्ले करण्यात येत आहेत. रशियाच्या या भूमिकेमुळे जगातील अनेक देशांनी युक्रेनला पाठिंबा दिलाय
तसेच रशियाविरोधात अनेक निर्बंध लागू केले असून निर्बंधांची ही संख्या ५५३० पर्यंत पोहोचली आहे. कास्टेलम.एआय (Castellum.ai) या संसेतस्थळावर याबाबत अधिक माहिती दिलेली आहे. कास्टेलम. एआयने सांगितल्यानुसार युक्रेनविरोधात युद्ध छेडण्याआधी रशियावर २७७८ निर्बंध होते. मात्र युद्ध सुरु होताच या वेगवेगळ्या निर्बंधांमध्ये वाढ करण्यात आली असून हा देश सर्वात जास्त निर्बंध असणारा देश बनला आहे.

संयुक्त राष्ट्र आणि युरोपीयन मित्र राष्ट्रांनी २२ फेब्रुवारी रोजी रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. रशियावरील दबाव दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्या नेटफ्लिक्स आणि अमेरिकन एक्स्प्रेसने रशियामधील आपली सेवा बंद केली आहे. तर निर्बंध लादणे म्हणजे युद्धाच्या घोषणेसारखेच आहे, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटलंय.

कोणत्या देशात किती निर्बंध आहेत ?

रशिया : २२ फेब्रुवारीच्या अगोदर रशियावर २७५४ प्रकारचे निर्बंध होते. मात्र रशिया आणि युक्रेनच्या युद्धानंतर आणखी २७७८ प्रकारच्या निर्बंधांमध्ये वाढ करण्यात आली. या निर्बंधांतर्गत रशियन मध्यवर्ती बँकेवर मर्यादा आणण्यात आल्या आहेत. रशिया टुडे आणि स्पुतनिक अशा माध्यमांच्या प्रसारणावर बंदी आणण्यात आली आहे. याबरोबरच रशियाविरोधात काही व्यापराविषयक तसेच आर्थिक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

इराण : रशियानंतर इराण हा देश सर्वात जास्त निर्बंध असणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. कास्टेलम.एआयनुसार या देशावर ३६१६ प्रकारचे निर्बंध आहेत. आण्विक कार्यक्रम आणि दहशतावाच्या समर्थनामुळे इराणवर हे निर्बंध लादण्यात आले आहेत. 1995 मध्ये अमेरिकेने इराणवर व्यापार आणि गुंतवणूकविषयक निर्बंध लागू केले होते.

सिरीया : युरोपीयन देश, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया या देशांनी गृहयुद्धामुळे सिरीया या देशावर २०११ नंतर अनेक आर्थिक निर्बंध लादले आहेत. कास्टेलन.एआय ने दिलेल्या माहितीनुसार सिरीयावर २६०८ वेगवेगळे निर्बंध आहेत. 2011 साली युरोपीयन युनियनने सिरीयावर नागरिकांचे दमन केल्यामुळे अनेक निर्बंध लादले होते. यामध्ये तेल आयातीवर बंदी, गुंतवणुकीवर निर्बंध, सिरीयन मध्यवर्ती बँकेची मालमत्ता गोठवणे, निर्यांतीवर निर्बंध, अशा प्रकारच्या निर्बंधांचा समावेश होता.

उत्तर कोरिया : आण्विक आणि बॅलेस्टिक मिसाईल धोरणामुळे उत्तर कोरियावर संयुक्त राष्ट्रांनी २००६ पासून निर्बंध लादलेले आहेत. कास्टेलम.एआयवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार या देशावर २०७७ प्रकारचे निर्बंध आहेत. तो निर्बंध असणाऱ्या देशांच्या यादीत चौथ्या क्रमांकाचा देश आहे. आण्विक कार्यक्रमात सहभाग असणाऱ्यांची मलमत्ता गोठवणे. महागड्या वस्तूंची आयात करण्यावर बंदी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कोळसा, खनिजे, कृषी उत्पादन, लाकूड, कापड, दगड यांच्या निर्यातीवर संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातलेली आहे.

व्हेनेझुएला : व्हेनेझुएला या दक्षिण अमेरिकी देशावर अमेरिकेने २०१७ पासून निर्बंध लादलेले आहेत. या देशावर एकूण ६५१ निर्बंध असून तो या यादीमध्ये पाचव्या स्थानावर आहे.

क्युबा : निर्बंधांच्या यादीमधील हा सहावा देश आहे. या देशावर एकूण २०८ प्रकारचे मागील ६० वर्षापेक्षाही जास्त काळापासून वेगवेगळे निर्बंध आहेत. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन केनेडी यांनी क्युबा जोपर्यंत मानवाधिकार आणि लोहशाहीकरण राबवत नाही, तोपर्यंत हे निर्बंध कायम राहतील असे सांगितले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here