क्राईमताज्या बातम्यापरळीबीड जिल्हा

अल्पवयीन मुलीवर, गावातीलचं नराधमाचा लैगिंक अत्याचार


बीड :  ( परळी ) म्हशीला चारापाणी टाकण्यासाठी गेलेल्या एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर, गावातीलचं नराधमाने लैगिंक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना बीडच्या परळी तालुक्यात असणाऱ्या नागापूरमध्ये घडली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पिडीत 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी, शेतात म्हशीच्या वासराला चारापाणी करत असताना तिघेजण तिच्या जवळ आले. त्यापैकी दोघेजण तिथुन निघून गेले व एक जण तिथेच थांबला.त्याने ” तू मला आवडते म्हणत बळजबरीने तिच्याशी शारीरिक संबंध केले “. त्याचबरोबर हे कोणाला सांगितल्यास जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली. या आशयाची फिर्याद पीडितेने दिली आहे. याप्रकरणी आरोपी अंकुश गायके याच्यावर, परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *