ताज्या बातम्या

डॉ. बबन चौरे, डॉ. अरुण राख यांची प्रोफेसरपदी निवड


पाथर्डी येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयाचे हिंदी विभागप्रमुख डॉ. बबन चौरे आणि राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. अरुण राख यांची नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रोफेसर म्हणून निवड केली आहे.
डॉ. बबन चौरे हे गेली २१ वर्ष बाबुजी आव्हाड महाविद्यालयात हिंदी विभागप्रमुख म्हणून कार्यरत असून त्यांना हिंदीतील प्रख्यात साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी निराला यांच्या साहित्यकृतीवरील शोधकार्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाने पीएच.डी. पदवी बहाल केली आहे. ते सध्या पुणे विद्यापीठाचे हिंदी विषयाचे संशोधन मार्गदर्शक म्हणून काम करत असून त्यांनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात रिसोर्स पर्सन म्हणून आपली व्याख्याने दिली आहेत.डॉ. चौरे यांचे आतापर्यंत विद्यापीठ अनुदान आयोगाचे दोन लघु शोधप्रकल्प तसेच ३० शोधनिबंध व ३ पुस्तके प्रकाशित झालेले असून त्यांना राष्ट्रीय हिंदी परिषद मेरठ यांच्यावतीने दिला जाणारा हिंदी भूषण पुरस्काराबरोबरच अन्य तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध समित्यांवरही काम केले आहे.
डॉ अरुण राख हे गेली १८ वर्ष महाविद्यालयात राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांना श्रीलंकेतील वांशिक संघर्ष : भारत श्रीलंका संबंध या आंतरराष्ट्रीय विषयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाने पीएच.डी. पदवी बहाल केली. ते सध्या पुणे विद्यापीठाचे राज्यशास्त्र विषयाचे संशोधन मार्गदर्शक म्हणून काम करत असून त्यांचे ४१ शोधनिबंध प्रकाशित आहेत. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अभ्यासक्रम निर्माण समितीवरही काम करत आहेत.
त्यांच्या या निवडीबद्दल पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष ॲड. सुरेशराव आव्हाड, प्राचार्य डॉ. जी.पी. ढाकणे आदींनी अभिनंदन केले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *