क्राईम

जनतेच्या पैशावर डल्ला !काॅंग्रेस खासदारांच्या घरावर IT ची रेड,200 कोटी रूपये जप्त, पैसे मोजता मोजता मशिन पडल्या बंद


झारखंडमधील काॅंग्रेसचे राज्यसभेचे खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या घरी आयकर विभागाने छाप्या टाकला. आयकर विभागाच्या छाप्यांमधून सुमारे 200 कोटी रूपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

तब्बल १९ बॅग्ज आणि काही कपाटमध्ये भरून ठेवलेल्या नोटा अनेकांना चक्रावून सोडतील. याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून काॅंग्रेसवर टिका केली आहे.

आयकर विभागाच्या पथकाने खासदार धीरज प्रसाद साहू यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. बंटी साहू यांच्या घरातून तब्बल १९ बॅग्ज आणि ९ कपाटांमध्ये असलेली २00 कोटी रूपयांच्या नोटा आयकर विभागाने जप्त केल्या आहेत. आयकर विभागाने या नोटा मोजण्यासाठी आणलेले मशिनच बंद पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यावरून आता भाजपने काॅंग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर देशवासी इन नोटों के ढेर को देखें और फिर इनके नेताओं के ईमानदारी के ‘भाषणों’ को सुनें… जनता से जो लूटा है, उसकी पाई-पाई लौटानी पड़ेगी, यह मोदी की गारंटी है। असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.

२०१८ मध्ये राज्यसभेच्या निवडणुकीदरम्यान निवडणुक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात धीरज प्रसाद साहू यांनी ३४ कोटी रूपयांची संपत्ती जाहीर केली होती. तसेच २ कोटी ३६ लाख रूपयांचे कर्ज जाहीर केले होते. २०१६-१७ च्या आयकर विभागामध्ये त्यांनी आपले उत्पन्न एक कोटी रूपयांपेक्षा जास्त असल्याचे जाहीर केले होते. साहू यांचे कुटुंब दारू व्यवसायाशी संबंधित असून बलदेव साहू अॅंड ग्रुॅप ऑफ कंपनीच मूळची झारखंडमधील लोहरदगा जिल्ह्यातील असून कंपनीने ४९ वर्षापूर्वी ओडीशात देशी दारू बनवण्यास सुरूवात केली होती. ही कंपनी बौद्ध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड ची पार्टनरशिप फर्म आहे. या कंपनीचे मालक बलदेव साहू इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड क्लालिटी बॉटलर्स प्रायव्हेट लिमिटे आणि किशोर प्रसाद विजय बेव्रहेजेस लिमिटेच आहेत.

दरम्यान, ‘गरीब हटाओ’चे नारे देत, जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकत, गरिबीचे सोंग आणत कसे दौलतजादे बनतात काँग्रेसी? याचे जितेजागते उदाहरण म्हणजे काॅंग्रेसचे खासदार धीरज साहू! आयकर बुडवून बेहिशेबी पैसा इतका दडवून ठेवला की मोजता मोजता मशिन्स बंद पडल्या.. जनतेला सांगायचे ‘धीरज रखो, भला होगा’ आणि स्वतः गरिबांच्या पैशावर डोळा ठेवून गब्बर व्हायचे. गरिबांच्या योजनांसाठी वापरला करोडो रुपयांचा आयकर बुडवायचा हाच या मद्यसम्राटाचा धंदा! भ्रष्टाचाराने भ्रष्टाचाराने बरबटलेले काँग्रेस राजवटीतील गरिबांचे लुटारू आता जनतेला पुराव्यासह दिसू लागले. मोहोब्बतच्या दुकानाच्या शटरमागे गरिबांना लुटणारे काँग्रेसचे असे ‘करप्शनचे काळीकुट्ट दुकान’ आहे. अशी टिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलीय.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *