पतीने लाकडी पाट पत्नीच्या डोक्यात घालून केली हत्या, नवऱ्यानेही कालव्यात घेतली उडी

0
247
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

घरगुती भांडणातून पतीने बायकोच्या डोक्यात पाट घालून हत्या केल्याची घटना घडली. पत्नीच्या हत्येनंतर नवऱ्यानेही कालव्यात उडी घेतली. लाखनी तालुक्यातील सिलोटी या गावात घटना घडली आहे. भारती चाचेरे आणि भारत चाचेरे अशी मयत पती-पत्नीची नावं आहेत. याप्रकरणी लाखनी पोलीस ठाण्यात हत्या आणि आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

काय आहे प्रकरण?

लाखनी तालुक्यातील सिलोटी गावात भारत चाचेरे आणि भारती चाचेरे हे दाम्पत्या आपल्या दोन मुलांसह राहते. भारत चाचेरे मजुरी काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. या दाम्पत्यामध्ये घरगुती कारणातून नेहमी वाद व्हायचे. बुधवारी नेहमीप्रमाणे पती-पत्नीमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेला अन् पतीने लाकडी पाट पत्नीच्या डोक्यात घालून तिची हत्या केली. पत्नीची हत्या केल्यानंतर पती फरार झाला.

पतीचा शोध घेतला तर…

दरम्यान, हत्येची घटना उघड होताच लाखनी पोलिसांनी माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच लाखनी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत महिलेचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. यानंतर पोलिसांनी फरार पतीचा शोध सुरु केला. पतीचा शोध घेत असतानाच गावातील कालव्यात त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला. यानंतर पतीच्या आत्महत्येची बाब उघडकीस आली.

एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलगी बारावीत शिकत आहे तर मुलगा दहावीत आहे. आई-वडिलांच्या भांडणात दोन मुलं अनाथ झाली आहेत. याप्रकरणी लाखनी पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here