घरकाम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ५० वर्षाच्या नराधमाचा बलात्कार

0
578
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

बिहारमध्ये एका मध्यमवयीन व्यक्तीने घरात काम करणाऱ्या मुलीवर बलात्कार केला. ती मुलगी गरोदर राहिल्यानंतर त्याने तिला खासगी दवाखान्यात नेले आणि तिचा गर्भपात केला.

पूर्णिया : बिहारमधील पूर्णियामध्ये १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. गावातील ५० वर्षीय व्यक्ती लग्नाच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अनेक महिने लैंगिक अत्याचार करत होता. मुलगी गरोदर राहिल्यानंतर त्याने उपचाराच्या बहाण्याने तिला खासगी दवाखान्यात नेले आणि तिचा गर्भपात केला. ही तरुणी आरोपीच्या घरी कामासाठी जात असे. हे संपूर्ण प्रकरण जिल्ह्यातील टिकापट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडलं आहे.

लग्नाच्या बहाण्याने मुलीवर लैंगिक अत्याचार : पीडितेच्या वडिलांनी टिकापट्टी पोलीस ठाण्यात लेखी अर्ज दिला असता हे प्रकरण उघडकीस आलं. अर्जात म्हटलं आहे की, त्यांची मुलगी गावातील एका ५० वर्षीय व्यक्तीच्या घरी घरगुती कामासाठी जात असे. मात्र त्या व्यक्तीची अल्पवयीन मुलीवर वाईट नजर होती. लग्नाच्या बहाण्याने त्याने मुलीवर अनेक महिने लैंगिक अत्याचार केला. या दरम्यान ही मुलगी गरोदर राहिली.

गरोदर असताना केला गर्भपात : पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या अर्जात पुढे म्हटले आहे की, तरुणी गर्भवती असल्याचे समजताच शुक्रवारी रात्री उशिरा ती व्यक्ती पीडितेला घेऊन शेजारच्या गावातील एका खासगी दवाखान्यात गेली. तेथे त्याने मुलीचा गर्भपात केला. सकाळी घरी परतल्यानंतर मुलीने आईला तिच्यासोबत घडलेल्या सर्व घटनेची माहिती दिली. मुलीवर झालेल्या अत्याचाराची माहिती कळताच कुटुंबियांनी तडक पोलीस स्टेशन गाठत लेखी अर्ज दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here