डान्स टीचरचा गर्लफ्रेन्डवर बलात्कार; मित्रांसोबतही सेक्स करण्यासाठी भाग पाडले

0
374
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

बंगळुरूमधील एका डान्स टीचरवर त्याच्या एक्स गर्लफ्रेन्डवर वर्षभरात अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित महिलेचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करून आरोपी तिला ब्लॅकमेल करत होता.

याप्रकरणी २३ वर्षीय पीडिताने कोडीगेहल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर आरोपी आणि त्याच्या दोन मित्रांना पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अँडी जॉर्ज असे मुख्य आरोपीचे नाव आहे. आरोपी हा खाजगी शाळेत डान्स टीचरची नोकरी करत असून तो विद्यारण्यापुरा येथील रहिवाशी आहे. पीडित मुलगी बेरोजगार असून बंगळुरूमध्ये तिच्या आई- वडिलांसोबत राहते. दोन वर्षांपूर्वी आरोपीची पीडिताशी सोशल मीडियावर ओळख झाली. त्यानंतर ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यावेळी दोघांनी एकमेकांसोबत खाजगी फोटो आणि व्हिडिओ बनवले. मात्र, जून २०२१ मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले. यानंतर आरोपीने पीडिताला फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. यानंतर तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नव्हेतर आरोपीने पीडिताला त्याच्या दोन मित्रांसोबतही शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले.

या तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आरोपी त्यांच्या मित्रांकडून ३ ते ५ हजार रुपये घेत असे. पीडिताने आरोपीला भेटणे बंद केल्यानंतर त्याने इंस्टाग्रामवर खाते उघडून तिचे फोटो आणि व्हिडिओ आपल्या मित्राला शेअर केले. याबाबत पीडिताला माहिती मिळताच तिने पोलिसांत तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या मित्रांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आरोपींकडून फोटो, व्हिडिओ, पेन ड्राईव्ह, लॅपटॉप आणि मोबाईल फोन जप्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here