क्राईम

त्याला भावाचा काटा काढायचा होता, पण अंधारात नेम चुकला अन्.


गावातील नागजी पटेल यांचा मुलगा छगनलाल 11 एप्रिल रोजी रात्री शेतात पिकांना देण्यासाठी गेला होता.

मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी रक्तबंबाळ अवस्थेत त्याचा मृतदेह सापडला. त्याच्या शरीरावर जखमा होत्या. यानंतर नागजी पटेल यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पटेल यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपास सुरु केला.

तपासादरम्यान पोलिसांना कनबा गावातील रहिवासी असलेल्या जीवनलाल याच्यावर संशय आला. पोलिसांनी जीवनलालला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने आधी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच जीवनलालने हत्येची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

अंधारात भावाऐवजी छगन मारला गेला

जीवनलालचा त्याचा भाऊ कचरा पटेल याच्याशी कनबा येथे बांधलेल्या दुकानावरून वाद सुरू होता. छगनलाल हा त्याचा भाऊ कचरा याला भांडणात सहकार्य करत असे. याबाबत जीवनलाल याने अनेक वेळा पंच पटेलांकडे तक्रारही केली. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. जीवनलाल 11 एप्रिल रोजी नवलश्याम मार्गावरून रात्री दुचाकीने गमदी आहाडाच्या दिशेने चालला होता. यादरम्यान एक व्यक्ती शेतातून प्लॉटकडे जाताना दिसला.

जीवनलालला वाटले की आपला भाऊ कचरा जात आहे. जीवनलालने पाठीमागून कृपाणी याच्याकडून त्याच्यावर हल्ला करून त्याची हत्या केली. पण नंतर कळलं की तो त्याचा भाऊ कचरा नसून छगन आहे. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र अखेर त्याला पकडलेच.

अश्याच माहितीसाठी आणि बातम्यासाठी येथे🪀 क्लिक करून whatsapp ग्रुपला नक्की जॉइन व्हा.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *