25.8 C
New York
Saturday, June 15, 2024

Buy now

लोणावळा शहर परिसरात चोरी करणारी टोळी गजाआड

- Advertisement -

लोणावळा शहर पोलिसांनी चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आणले असून चोरीच्या मुद्देमालासह सात जणांना ताब्यात घेतले आहे. (Lonavala) यावेळी पोलिसांनी आरोपींकडून 52 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

चिंतन लक्ष्मण पाठारे (वय 19, रा. लोणावळा), शेखर मारुती मंजुळे (वय 19, रा.मावळ), आकाश भरत ओहाळ (वय 24, रा. केवरेगाव ता. मावळ), सबरोज अहमद निहाज अहमद मुजावर (वय 24, रा. डोंगरगाव ता. मावळ), रफिक शमशेर पठाण (वय 24, रा. देवणी जि.लातूर सध्या राहणार लोणावळा), रविशंकर रामदास गौतम (वय 20, रा. कानपूर सध्या रा. वलवण पुलाजवळ लोणावळा), निखिल महेंद्र निकाळजे (वय 26 रा. नांगरगाव लोणावळा) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेला 52 हजार 200 रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच आरोपींनी वापरलेली एकूण तीन वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत.

आरोपीकडून नांगरगाव, भांगरवाडी आणि रेल्वे परिसरात (Lonavala) चार गुन्हे घडले होते. तर, एक गुन्हा बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला होता.

नवगण न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे🪀क्लिक करा !

- Advertisement -

Related Articles

Latest Articles