कोरोना वार्ता

देशात वाढतायत कोरोनाचे नवीन रूग्ण, एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू


देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रूग्ण वाढू लागले आहेत. कोरोनाचा सब व्हिरियंट JN.1चा प्रसार वेगाने पसरू लागल्यानं कोरोनाचाही संसर्ग होऊ लागला आहे. पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे.

त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी ३३५ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. धक्कादायक म्हणजे, रविवारी पाच करोनाबाधितांचा मृत्यूही झाला आहे. पाच मृत्यूंपैकी एक मृत्यू उत्तर प्रदेशमधील आहे. तर चार मृत्यू एकट्या केरळमध्ये आहेत. तसंच, JN.1 हा सब व्हेरियंटसुद्धा केरळमध्येच आढळून आला आहे.

केरळमधील थिरूवअनंतपुरम येथील काराकुलम येथे ८ डिसेंबर रोजी एका वृद्ध महिलेला ‘जेएन १’ची बाधा झाल्याचे निदर्शनास आले.या महिलेची १८ नोव्हेंबर रोजी करोनाविषयक (आरटीपीसीआर) चाचणी करण्यात आली. तिला सौम्य प्रकारची लक्षणे आढळली होती. तसेच तिला थोडासा अशक्तपणाही जाणवत होता. मात्र आता तिची प्रकृती उत्तम असल्याची मााहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महाव्यवस्थापकीय संचालक डॉ. राजीव बहल यांनी दिली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *