चौसाळा पोलीस स्टेशन येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जंयती उत्साहात साजरी


चौसाळा पोलीस स्टेशन येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जंयती उत्साहात साजरी ,महापुरूषाना जातीत बंदीस्त करू नका –पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव

बीड : ( गोरख मोरे )विश्वरत्न महामानव परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी जंयती बीड तालुक्यातील चौसाळा येथील पोलीस स्टेशनला मोठया उत्साहात साजरी करण्यात आली प्रथमता महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले यावेळी नेकनुर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, महापुरूष हे कोण्या एका जाती पुरते मर्यादित नसुन महापुरूषाना एका जाती पुरते मर्यादित ठेवु नका प्रत्येक महापुरूषाची जयंती ही सामाजिक उपक्रम राबवुन साजरी करावी यावेळी चौसाळा पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार बाबासाहेब डोंगरे, राठोड साहेब, देशमुख साहेब, जायभाय साहेब, नानासाहेब जाधव साहेब, दैनिक लोकांकित न्युज चॅनलचे बीड जिल्हा प्रतिनिधी विवेक( बाबा) कुचेकर यांच्यासह कर्मचारी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here