धानोरा येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापक सय्यद मुक्तार सर यांचे दुःखद निधन

बीड : ( प्रतिनिधी – गोरख मोरे ) : आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा येथील रहिवासी व कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धानोरा येथे कार्यरत असलेले इतिहास विषयाचे प्राध्यापक सय्यद मुक्तार सर यांचे दिनांक १४ एप्रिल २०२२ गुरुवार रोजी रात्री १०:४५ वाजता अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले .
प्राध्यापक सय्यद मुक्तार सर हे सर्वांशी मन मिसळून राहणारे व्यक्तिमत्व होते . धानोरा ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच पदावर असताना त्यांच्या कार्यकाळात त्यांच्यापर्यंत आलेल्या प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याचा त्यांनी चांगल्या प्रकारे प्रयत्न केला .प्रा. सय्यद मुक्तार सर यांच्या पाठीमागे पत्नी , दोन मुले , आई , दोन भाऊ , बहिणी , पुतणे , असा त्यांचा परिवार असून जावेद सय्यद यांचे ते चुलते होते .प्रा. सय्यद मुक्तार सर यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून त्यांचा दफन विधी दिनांक १५ एप्रिल २०२२ शुक्रवार रोजी धानोरा येथील कब्रस्तान मध्ये दुपारी १:३० वाजता आयोजित केला असून ,प्रा. सय्यद परिवारांच्या दुःखात लोक पालक पत्रकार संघाचे बीड जिल्हा अध्यक्ष पत्रकार गोरख मोरे सह त्यांची सर्व टीम सहभागी आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here